शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

"वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाला ७५० कोटी, आणखी पावणेतीन हजार कोटींची गरज"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 08:36 IST

Wardha-Yavatmal-Nanded railway: महाराष्ट्रातील दोन मागास भागांना समृद्धीच्या मार्गावर नेण्याची ताकद असलेला बहुप्रतीक्षित वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे प्रकल्प आता आणखी गतिमान होणार आहे. (Budget 2024) आज सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात या प्रकल्पाला साडेसातशे कोटींच्या तरतुदीचे आर्थिक इंजिन जोडले गेले आहे.

नागपूर - महाराष्ट्रातील दोन मागास भागांना समृद्धीच्या मार्गावर नेण्याची ताकद असलेला बहुप्रतीक्षित वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे प्रकल्प आता आणखी गतिमान होणार आहे. आज सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात या प्रकल्पाला साडेसातशे कोटींच्या तरतुदीचे आर्थिक इंजिन जोडले गेले आहे. मात्र, जाणकारांच्या माहितीनुसार या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आणखी अडीच ते पावणेतीन हजार कोटींची गरज भासणार आहे.

२८४.६५ किलोमीटर लांबीचा वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे मार्ग ज्यावेळी मंजूर झाला होता त्यावेळी त्यासाठी २७४.५५ कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, मध्यंतरी प्रकल्प रेंगाळल्याने त्याचे बजेटही वाढले. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यांनी या संबंधाने राज्य, तसेच केंद्रात सातत्याने पाठपुरावा केला. डॉ. दर्डा यांच्या प्रयत्नांमुळेच राज्य सरकारने या प्रकल्पासाठी स्पेशल वॉर रूम तयार केली. या कामात कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी विशेष सूचना दिल्या आणि निधीही उपलब्ध करून दिला. त्याचमुळे गेल्या काही वर्षांत या प्रकल्पाला गती मिळाली आहे. 

या पार्श्वभूमीवर, आतापावेतो १९१० कोटी, ७ लाख रुपये खर्च झाले असून, त्यातून वर्धा जिल्ह्यातील देवळी, भिडी आणि यवतमाळ जिल्ह्यातील कळंब या रेल्वेस्थानकापर्यंतचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. ताशी १२५ किलोमीटर वेगाने रेल्वे गाडी चालवून देवळी ते कळंबपर्यंतची ट्रायलही पार पडली आहे. त्यामुळे वर्धा ते कळंबपर्यंत रेल्वेगाडी सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला असून, त्यासाठी आधी  १२ जानेवारी २०२४ चा मुहूर्त ठरविण्यात आला होता. नंतर ११ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे उदघाटन करण्यात येणार असल्याची चर्चाही सुरू झाली. या पार्श्वभूमीवर, अंतरिम अर्थसंकल्पात वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी ७५० कोटी रुपयांची तरतूद जाहीर झाली. तथापि, आणखी ३ हजार ४४५.४८ कोटी रुपये खर्च या मार्गासाठी अपेक्षित असल्याचे जाणकार सांगत आहेत. तो तातडीने उपलब्ध करून दिला जावा, अशी मागणीही पुढे आली आहे.  

तरतुदीचे स्वागत, पुरेशी नाही : डॉ. विजय दर्डा लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांच्याशी या संबंधाने चर्चा केली असता त्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. मात्र, वर्धा-यवतमाळ-नांदेड प्रकल्पाचे ७५० कोटींनी भागणार नाही. त्यासाठी आवश्यक संपूर्ण निधी तातडीने उपलब्ध करून दिला जावा आणि हा प्रकल्प शक्य तेवढ्या लवकर पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव चांगली पावलं उचलत आहेत. सर्वसामान्य व्यक्तींचे दळणवळणाचे रेल्वे मुख्य साधन आहे. त्याचे नूतनीकरण होत आहे, हे काैतुकास्पद असल्याचे डॉ. दर्डा यांनी म्हटले.  मात्र, ज्येष्ठ नागरिकांना सुलभ जाणे-येणे करता यावे यासाठी सर्व रेल्वे स्थानकांवर एस्केलेटर सुरू करावे. देशातील सर्व ठिकाणचे रेल्वे क्रॉसिंग फाटक बंद करून उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गाची निर्मिती करावी, तसेच अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, अशी मागणीवजा अपेक्षाही डॉ. दर्डा यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2024Indian Railwayभारतीय रेल्वेYavatmalयवतमाळbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्ला