शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

Budget 2019 : सरकारने १८ कोटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:30 IST

केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन (ईपीएफओ) अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत कुठलीही तरतूद केली नसल्याचा आरोप निवृत्त कर्मचारी (१९९५) राष्ट्रीय समन्वय समितीने केला आहे. पेन्शन वाढ करण्याची मागणी करूनही सरकारतर्फे याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे बजेटमध्ये ६५ लाख निवृत्त कर्मचारी आणि भविष्यात निवृत्त होणाऱ्या जवळपास १८ कोटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका समितीने केली आहे.

ठळक मुद्देनिवृत्त कर्मचारी समन्वय समितीचा आरोप : पेन्शनबाबत कुठलीही तरतूद नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन (ईपीएफओ) अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत कुठलीही तरतूद केली नसल्याचा आरोप निवृत्त कर्मचारी (१९९५) राष्ट्रीय समन्वय समितीने केला आहे. पेन्शन वाढ करण्याची मागणी करूनही सरकारतर्फे याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे बजेटमध्ये ६५ लाख निवृत्त कर्मचारी आणि भविष्यात निवृत्त होणाऱ्या जवळपास १८ कोटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका समितीने केली आहे.समितीचे राष्ट्रीय महासचिव प्रकाश पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार असंघटित क्षेत्रात ईपीएफओअंतर्गत निमशासकीय, अनुदानित शाळा, सहकारी बँक, खासगी कंपन्या, कॉर्पोरेट, महामंडळ अशा १९० प्रकारच्या सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. अशा वर्तमानात कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या २० कोटीच्या घरात असून, त्यातील १२ कोटी कामगारांचे मासिक पगार १५ हजार रुपयाच्या वर तर आठ कोटी कामगारांचा पगार १५ हजार रुपयाच्या खाली आहे. त्यांनी सांगितले की, ईपीएफओअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे १३ लाख कोटी रुपये भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा आहेत़ त्यानुसार विचार केल्यास सरकार कर्मचाऱ्यांना ९००० रुपये निवृत्ती वेतन आणि महागाई भत्ता देण्यात सक्षम आहे. विशेष म्हणजे २०१३ मध्ये भगतसिंह कोशियारी कमिटीने सादर केलेल्या अहवालात सर्व कर्मचाऱ्यांना ३००० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक पेन्शन देण्याची शिफारस केली होती. त्यानंतर २०१४ मध्ये एन.के. प्रेमचंद्रन कमिटीने बिल सादर केले ज्यात सगळ्यांना समान पेन्शन देण्याची शिफारस केली होती. मात्र हे खासगी बिल असल्याचे सांगत निरस्त करण्यात आले. पुढे सरकारने निवृत्ती वेतनाबाबत हाय पॉवर कमिटीची स्थापना केली. या कमिटीनेही ईपीएफओअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला. मात्र सरकारने या कमिटीची शिफारसही स्वीकारली नसल्याचे पाठक यांनी स्पष्ट केले.सरकारने केंद्र व राज्याच्या संघटित कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्वांना एकच पेन्शन योजना लागू करावी, निवृत्त कर्मचाऱ्यांना ९००० रुपये पेन्शन व महागाई भत्ता देण्यात यावा आदी मागण्या अर्थ मंत्रालय व पंतप्रधान यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सरकारने यावर कुठलीही तरतूद केली नसल्याने येत्या निवडणुकात कार्यरत व निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे ३६ कोटी मतदान सरकारविरोधात पडेल किंवा नोटा या नकाराधिकाराचा वापर केला जाईल, असा इशारा पाठक यांनी दिला. अंशदानाचे ६६ हजार कोटी सरकारच्या तिजोरीतभविष्य निर्वाह निधी कायदा १९५२ व कर्मचारी निवृत्ती वेतन योजना १९७१ नुसार ईपीएफओअंतर्गत कर्मचाऱ्यांना पूर्ण निवृत्ती वेतनावर १.१६ टक्के अंशदान देण्यात येत होते. मात्र केंद्र सरकारने १ सप्टेंबर २०१४ पासून ज्यांचा पगार १५००० रुपयांच्या वर आहे त्यांचे अंशदान बंद करून १२ कोटी कर्मचाऱ्यांना धक्का दिला आहे. या अंशदानापोटी सरकारने वर्षाला ६६,८१९ हजार कोटी म्हणजे चार वर्षात जवळपास ४ लाख कोटींची बचत केली आहे. कर्मचाऱ्यांचा हक्काचा पैसा लंपास करणे अन्यायकारक असल्याचा आरोप पाठक यांनी केला. दुसरीकडे केंद्र व राज्याच्या अंशदानात चार टक्केची वाढ केल्याची माहिती त्यांनी दिली. ३००० पेन्शन जुनीच योजनाअर्थमंत्र्यांनी असंघटित क्षेत्रातील कामगारांना ३००० रुपये पेन्शन देण्याची घोषणा केली. मात्र ही जुनीच योजना असल्याचा दावा पाठक यांनी केला. अंगणवाडी कर्मचारी, बांधकाम व इतर क्षेत्रातील असंघटिक कामगारांना मासिक १०० रुपये भरावे लागेल. त्यात सरकारचा तेवढाच भाग राहील व त्यानुसार पेन्शन मिळेल. जुन्याच योजनेला सर्वासमावेशक करून सादर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Employeeकर्मचारी