शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
3
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
4
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
5
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
6
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
7
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
8
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
10
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
11
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
12
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
13
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
14
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
15
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
16
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
17
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
18
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
19
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
20
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

एसीबीने पकडला दलाल

By admin | Updated: January 6, 2015 01:06 IST

कोर्टातून निघालेला वॉरंट थांबवतो आणि पुढील कारवाईसुद्धा निस्तरतो, असे सांगून पाच हजारांची लाच मागणाऱ्या एका दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने आज रात्री अटक केली.

पाच हजारांची लाच स्वीकारली नागपूर : कोर्टातून निघालेला वॉरंट थांबवतो आणि पुढील कारवाईसुद्धा निस्तरतो, असे सांगून पाच हजारांची लाच मागणाऱ्या एका दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने आज रात्री अटक केली. अमर मन्नूलाल गौर (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. तो यशोधरानगरातील पांडे मोहल्ल्यात राहतो. तक्रारकर्ते वासुदेव वैरागडे हे ट्रॅव्हल एजंट आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांची सुमो विकली. मात्र, त्याचे कागदोपत्री नोंद झाली नाही. वैरागडे यांच्या नावावर असलेल्या या सुमोचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीने सुमो मालकाच्या नावे न्यायालयातून वॉरंट काढला. आरोपी गौर हा कोर्टाच्या परिसरात दलालीचे काम करतो. त्याने लगेच वैरागडे यांच्याशी संपर्क साधला. वॉरंटची तारीख वाढवून प्रकरण निकाली काढण्यासाठी पाच हजार रुपये पाहिजे, असे गौर म्हणाला. त्याने ही रक्कम कोर्टातील लोकांकरिता लाच म्हणून मागितली. प्रारंभी त्याने आपण कोर्टात लिपिक असल्याचेही सांगितले. प्रत्यक्षात तो कोर्टाचा कर्मचारी नसल्याची माहिती मिळाल्यामुळे वैरागडे यांनी एसीबीचे अधीक्षक प्रकाश जाधव यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सापळ्याचे आयोजन करण्यात आले. संपर्काअंती गौर याने लाचेची रक्कम घेऊन वैरागडेंना पाचपावलीतील राणी दुर्गावती चौकात बोलावले. ठरल्याप्रमाणे सायंकाळी ६.३० वाजता वैरागडे तेथे पोहोचले. त्यांच्याकडून लाचेचे पाच हजार रुपये स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, हवालदार विलास खणके, नायक अजय यादव, चंद्रनाग ताकसांडे, चंद्रशेखर ढोक, मनोहर डोईफोडे यांनी आरोपी अमर गौरच्या मुसक्या बांधल्या. (प्रतिनिधी)