शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या हितासाठी जीएसटी आणा

By admin | Updated: January 6, 2016 03:48 IST

रिटेल व्यापाऱ्यांच्या हितासाठी जीएसटी तातडीने लागू करण्याची मागणी देशातील रिटेल व्यापाऱ्यांची शिखर ...

‘कॅट’ची एकमुखी मागणी : दोन दिवसीय संमेलननागपूर : रिटेल व्यापाऱ्यांच्या हितासाठी जीएसटी तातडीने लागू करण्याची मागणी देशातील रिटेल व्यापाऱ्यांची शिखर संघटना कॉन्फडरेशन आॅफआॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) मंगळवारी येथे केली. ‘कॅट’चे दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलन रामदासपेठेतील एका हॉटेलमध्ये मंगळवारपासून सुरू झाले. संमेलनात देशभरातील २०० पेक्षा जास्त व्यापारी आणि कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. व्यापारी नेत्यांनी सर्वसंमतीने प्रस्ताव पारित करून केंद्र सरकारने देशात लवकरच जीएसटी लागू करावा, अशी मागणी केली. जीएसटीचे प्रस्तावित स्वरूप आणि त्याची प्रक्रिया व अंमलबजावणीवर नेत्यांनी चिंता व्यक्त केली. जीएसटी संदर्भात सरकारने व्यापारी आणि उद्योजकांशी चर्चा करावी, अशी मागणी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया होते. ते म्हणाले, रिटेल व्यवसायाला आधुनिक करण्याचा प्रयत्न कॅटचा प्रयत्न आहे. एक टॅक्स व एक अ‍ॅथारिटी असलेले जीएसटी लागू करण्याची त्यांनी मागणी केली. त्यामुळे देशातील सर्व राज्यांमध्ये कराचे दर आणि जीएसटी कायदा समान राहील. भारत एक मार्केट म्हणून विकसित व्हावे. यावेळी कॅटचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल, एचडीएफसी ई-कॉमर्स प्रमुख स्मिता भगत, मास्टर कार्डचे गुरुदीप मदान, सीआयबीआयएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षला चांदूरकर, सिंगापूर येथील शॉप मॅटिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिनाज, एचडीएफसीचे हरविंदर आत्माराम, ओला कॅबचे जॉय बांदेकर, कॅटचे वरिष्ठ उपाध्यक्ष ब्रिजमोहन अग्रवाल, कॅट नागपूरचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर, महामंत्री फारुख अकबानी, ज्ञानेश्वर रक्षक उपस्थित होते.(प्रतिनिधी) १०० जीएसटी संमेलन घेणारप्रवीण खंडेलवाल म्हणाले, जीएसटी विधेयक राज्यसभेत पारित करण्यासाठी काँग्रेस आणि अण्णाद्रुमक पक्षाकडे मागणी करण्यात येणार आहे. यासाठी ‘कॅट’ १० जानेवारीपासून संसदेच्या बजेट सत्रापर्यंत राष्ट्रीय अभियान राबविणार आहे. याअंतर्गत देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांना निवेदन देऊन जीएसटीचे समर्थन देण्याची मागणी करण्यात येणार आहे. यादरम्यान जवळपास १०० जीएसटी संमेलन आयोजित करण्यात येईल. याशिवाय देशातील विविध व्यापारी संघटनांना जीएसटीसाठी पंतप्रधानांना पत्र पाठविण्याचे आवाहन तसेच दिल्लीत एक रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रसिद्धी माध्यमाच्या अहवालानुसार जीएसटीमध्ये व्यापाऱ्यांना आठ फॉर्म भरावे लागेल. असे झाल्यास जीएसटीचे स्वरूप विकृत होईल आणि कागदोपत्री कारवाई वाढेल. त्यामुळे कराचा टप्पा वाढविण्याचे विचार विफल होईल. देशात कॅशरहित अर्थव्यवस्था राहावी, यावर कॅटचा भर असल्याचे खंडेलवाल म्हणाले.