शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणातील दुरवस्था कुलपतींच्या निदर्शनास आणून द्या

By admin | Updated: December 24, 2015 03:35 IST

शिक्षण क्षेत्रातील दुरवस्था कुलपती कार्यालयाच्या निदर्शनास आणून द्यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संबंधित याचिकाकर्त्याला दिले.

हायकोर्टाचे निर्देश : परिणामकारक कारवाई करण्याची विनंतीनागपूर : शिक्षण क्षेत्रातील दुरवस्था कुलपती कार्यालयाच्या निदर्शनास आणून द्यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संबंधित याचिकाकर्त्याला दिले. तसेच, कुलपती कार्यालयाने याप्रकरणाची पडताळणी केल्यानंतर लवकरात लवकर परिणामकारक कारवाई करावी, अशी विनंती केली.सुनील मिश्रा यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विविध गैरप्रकारासंदर्भात दोन रिट याचिका दाखल केल्या होत्या. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांनी या याचिका निकाली काढून विविध निर्देश दिलेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, मिश्रा यांना येत्या दोन महिन्यांत कुलपती कार्यालयाला निवेदन सादर करून गैरप्रकाराची माहिती द्यायची आहे. यानंतर कुलपती कार्यालयाने आरोपांची पडताळणी करून तातडीने परिणामकारक कारवाई करायची आहे. नागपूर विद्यापीठाने मिश्रा यांना आवश्यक माहिती द्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, कुलपती कार्यालयातर्फे संबंधित संस्थांना शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा आग्रह करण्यात येईल, अशी खात्रीही न्यायालयाने व्यक्त केली आहे. माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ व डॉ. राजीव सपकाळ यांनी अनेक महाविद्यालयांना मान्यता नसलेले अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची परवानगी दिली व त्यातून कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्तीचा अपहार केला. यामुळे त्यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविण्यात यावी. मान्यता नसलेले अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता काढून घेण्यात यावी. परीक्षा नियंत्रकांनी मान्यता नसलेले अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ नये. आवश्यक शिक्षकांची नियुक्ती केल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला मान्यता देण्यात येऊ नये. पूर्णवेळ शिक्षक नाहीत अशा महाविद्यालयांतील अभियांत्रिकी, औषधीशास्त्र, व्यवस्थापन व शिक्षण अभ्यासक्रमाची मान्यता काढून घेण्यात यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते.