शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर फौजदाराला कारावास

By admin | Updated: April 30, 2016 02:59 IST

पाच हजाराची लाच घेतल्या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकाला (फौजदार) लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या ....

विशेष न्यायालय : पाच हजाराची घेतली होती लाचनागपूर : पाच हजाराची लाच घेतल्या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकाला (फौजदार) लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावास आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. असगर अली अब्बास अली, असे या फौजदाराचे नाव असून लाचेच्या सापळ्याच्या वेळी तो सक्करदरा पोलीस ठाण्यात नेमणुकीस होता. खटल्याची पार्श्वभूमी अशी, सोमवारी क्वॉर्टर बुधवारी बाजार चौकात राहणारे मोहम्मद यासीन ऊर्फ जिन्नात बाबा मोहम्मद याकूब यांचा भाचा मोहम्मद दानिश ऊर्फ गोलू जमील शेख याचा ३ मे २०११ रोजी अपघात होऊन मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास फौजदार अली याच्याकडे होता. मोहम्मद यासिन यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी अपघात दावा करावयाचा असल्याने त्यांनी अपघात प्रकरणाच्या कागदपत्राची मागणी अली याच्याकडे केली होती. त्यावेळी असगर अली याने त्यांना , ‘तुम्हाला सहा-सात लाख रुपये मिळतील, त्यात माझा काय फायदा’, असा सवाल करीत कागदपत्रांसाठी पाच हजाराच्या लाचेची मागणी केली होती. लाच द्यायची नसल्याने मोहम्मद यासीन यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी २३ मे २०११ रोजी मोहम्मद यासीन यांच्या सोमवारी क्वॉर्टर येथील घरी सापळा रचला होता. असगर अली याने लाचेच्या रकमेची मागणी करून स्वीकारताच त्याला रंगेहात अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक एच. आर. रेड्डीवार यांनी करून आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात पाच साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपी फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावास, ३ हजार रुपये दंड, कलम १३ (१)(ड), १३(२) अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावास आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील अजय लांबट तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. पी. के. मिश्रा यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)