शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ता डावलणे समानतेच्या हक्काचा भंगच

By admin | Updated: July 16, 2016 02:56 IST

प्रादेशिक कोट्यामुळे गुणवत्ता डावलून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात असतील तर, अशी कृती भारतीय नागरिकांना समानतेचा हक्क बहाल....

हायकोर्टाचे मत : वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रादेशिक कोट्याविरुद्धची याचिका नागपूर : प्रादेशिक कोट्यामुळे गुणवत्ता डावलून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात असतील तर, अशी कृती भारतीय नागरिकांना समानतेचा हक्क बहाल करणाऱ्या राज्यघटनेतील चौदाव्या अनुच्छेदाचा भंग ठरते असे मौखिक मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी व्यक्त केले. विदर्भ व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी ठेवण्यात येणारा प्रादेशिक कोटा रद्द करण्यात यावा, अशा विनंतीसह उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, त्यांनी २०१५ मधील प्रवेशाची स्थिती लक्षात घेता वरीलप्रमाणे मत व्यक्त केले. २०१५ मध्ये प्रादेशिक कोट्यामुळे उर्वरित महाराष्ट्रात गुणवत्ता यादीतील ४१३० व्या क्रमांकावरील विद्यार्थ्याला शेवटचा प्रवेश मिळाला होता. विदर्भातील शेवटचा प्रवेश २४७४ व्या क्रमांकावरील तर, मराठवाड्यातील शेवटचा प्रवेश २६७३ व्या क्रमांकावरील विद्यार्थ्याला मिळाला होता. प्रादेशिक कोट्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील असंख्य गुणवंत विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले. उर्वरित महाराष्ट्रात त्यांच्यापेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. न्यायालयाने आता २०१४ मध्येही अशीच स्थिती होती काय हे पाहण्यासाठी याचिकाकर्त्यांना माहिती सादर करण्यास सांगितले आहे. याचिकेवर २२ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. तेजस्विनी गाडे व इतर चार पालकांचा याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे. त्यांची मुले वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी तयारी करीत आहेत. सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा चार गटात विभागण्यात आल्या आहेत. त्यानुसार, राष्ट्रीयस्तरावर १५ टक्के तर, अपंगांसाठी ३ टक्के जागा राखीव असतात. उर्वरित जागांमध्ये ७० टक्के प्रादेशिक तर, ३० टक्के राज्यस्तरीय कोटा असतो. शासकीय व शासनाद्वारे अनुदानित महाविद्यालयांतील ७५० जागा विदर्भात, ५०० जागा मराठवाड्यात तर, १६१० जागा उर्वरित महाराष्ट्रात आहेत. आता राज्यभरात एकच ‘सीईटी’ होत असल्यामुळे प्रादेशिक कोट्याची गरज नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)