शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेला ‘बूस्ट’

By admin | Updated: November 6, 2014 02:40 IST

डबघाईस आलेल्या नागपूर जिल्हा बँकेला केंद्र सरकारने मदतीचा हात दिल्याने आता बँकेला पुढील काळात ‘बूस्ट’ मिळणार आहे.

मोरेश्वर मानापुरे नागपूर डबघाईस आलेल्या नागपूर जिल्हा बँकेला केंद्र सरकारने मदतीचा हात दिल्याने आता बँकेला पुढील काळात ‘बूस्ट’ मिळणार आहे. त्यामुळे बँकेच्या ठेवीदारांना दिलासा मिळेल.केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी जिल्हा बँकांच्या पुनरुज्जीवन धोरणांतर्गत घेतलेल्या निर्णयानुसार बँकेला आर्थिक परवाना मिळण्याचे मार्ग खुले झाले आहेत. केंद्र सरकार, नाबार्ड आणि राज्य सरकार यांच्याकडून जिल्हा बँकेला परवान्यासाठी हवी असलेली रक्कम मिळेल.बँकेत ८५० कोटींच्या ठेवीरिझर्व्ह बँकेने नागपूर जिल्हा बँकेवर ३५(अ) नुसार ९ मे २०१२ रोजी कारवाई केली. त्यावेळी बँकेकडे शेतकरी, शिक्षक, सहकारी सोसायट्या अशा एकूण ५ लाख ठेवीदार आणि खातेदारांच्या १२७५ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. त्यानंतर अनेकांनी ठेवी काढून घेतल्या. सध्या ८६९ कोटींच्या ठेवी आहेत. जिल्हा परिषदेने ठेवी काढल्यानंतर जानेवारी २०१४ मध्ये संचालक मंडळाने मुदतपूर्व ठेवी देण्यावर निर्बंध आणले. ९ मार्च २०१४ रोजी रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त केले आणि संपूर्ण आर्थिक व्यवहारावर निर्बंध आणले तसेच रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेचा परवाना मिळविण्यासाठी आलेला अर्ज फेटाळून लावला. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाविरोधात जिल्हा बँकेने हायकोर्टात याचिका दाखल केली. ३० मे २०१४ रोजी हायकोर्टाने रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर स्थगिती दिली. हायकोर्टाच्या निर्णयावर रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. २५ जुलै २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा हायकोर्टाचा आदेश ‘जैसे थे’ ठेवला. आतापर्यंत हीच परिस्थिती होती.केंद्राची पुनरुज्जीवन योजनाकेंद्र सरकारची जिल्हा बँकांसंदर्भातील पुनरुज्जीवन योजना उत्तर प्रदेशासाठी होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्यानंतर योजनेत २१ जुलै २०१४ रोजी महाराष्ट्रातील डबघाईस आलेल्या नागपूर, वर्धा आणि बुलडाणा जिल्हा बँकांचा समावेश करण्यात आला. याची माहिती राज्य शासनाला देण्यात आली. राज्य सरकारनेसुद्धा या योजनेला मंजुरी दिली होती. गडकरींनी शब्द पाळलानागपूर, वर्धा आणि बुलडाणा जिल्हा सहकारी बँकांची अवस्था बघता या बँकांचे पुनरुज्जीवन करण्यात यावे, अशी त्या भागातील शेतकऱ्यांची मागणी होती. शेतकऱ्यांचे हित पाहता राजकारणाच्या पलीकडचा विचार केला पाहिजे, या दृष्टिकोनातून मी हा विषय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे मांडला होता. त्याचा पाठपुरावा केला. या निर्णयामुळे तिन्ही बँकांना आर्थिक मदत होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उशिरा रात्री लोकमतशी बोलताना व्यक्त केला.