शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मुकेशच्या बचावासाठी बुकींची लॉबिंग

By admin | Updated: November 17, 2015 04:36 IST

पोलीस संरक्षणात धमक्या देऊन खंडणी वसुली करणाऱ्या कुख्यात मुकेश शाहू याच्याविरुद्ध गुन्हे दाखल होऊ नये

नागपूर : पोलीस संरक्षणात धमक्या देऊन खंडणी वसुली करणाऱ्या कुख्यात मुकेश शाहू याच्याविरुद्ध गुन्हे दाखल होऊ नये म्हणून शहरातील काही गुंड आणि बुकी जोरदार लॉबिंग करीत असल्याची चर्चा आहे. त्याचमुळे तीन दिवस होऊनही लकडगंज पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगितले जाते. कळमन्यातील सोनबानगरात राहणारा मुकेश शाहू गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. तो आणि त्याच्या टोळीतील साथीदार छोटे मोठे दुकानदार, कबाडी, तेलमाफिया, कोळसा तस्करी करणारे आणि अवैध धंदे करणाऱ्यांकडून नियमित लाखोंची खंडणी वसूल करायचा. माहितीच्या अधिकारात माहिती मिळवणारा मुकेश स्वत:ला आरटीआय कार्यकर्ता म्हणवून घेत होता. आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगून मुकेशने पोलीस संरक्षणही मिळवले होते. त्याच्यासोबत पोलीस राहात असल्याने त्याचा वापर तो भलत्याच कामासाठी करीत होता. स्वत:भोवती पोलीस असल्याचे दाखवून तो अनेकांवर दबाव आणायचा. खोट्या तक्रारीचा धाक दाखवून आणि प्रसंगी मारहाण करूनही आरोपी मुकेश आणि त्याचे साथीदार खंडणी वसूल करायचे. अनेक कुख्यात गुन्हेगार, बुकी,अवैध धंदे करणारे तसेच काही भ्रष्ट पोलिसांशी संबंध असल्यामुळे आणि सोबत बॉडीगार्ड म्हणून पोलीस दिसत असल्याने मुकेश आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध कुणी आवाज उचलत नव्हता. त्यामुळे अलीकडे मुकेश दिवसाढवळ्या महिलांच्या अंगावर हात टाकायला पुढे मागे पहात नव्हता. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्याने एका महिलेला चक्क लोखंडी रॉडने मारहाण केली. भर वस्तीत तिचे केस धरून फरफटत नेले. वस्तीतील नागरिकांनी त्याला रोखण्याचे प्रयत्न केले असता आरोपी मुकेशने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी त्याच्यावर धाव घेतली. यावेळी तो धमकी देत पळून गेला. पीडित महिलेने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. कळमना पोलिसांनी त्याला अटक करून कोठडीत डांबताच कुख्यात मुकेशच्या अत्याचाराने त्रस्त असलेल्यांनी त्याच्याविरुद्ध तक्रारी करण्यासाठी विविध पोलीस ठाण्यात धाव घेतली. विनयभंग आणि खंडणी वसुलीचे मुकेश आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध एकापाठोपाठ पाच गुन्हे दाखल झाले. अशाच प्रकारे तीन दिवसांपूर्वी नीलेश शाहू नामक कबाडी व्यापाऱ्यानेही लकडगंज ठाण्यात मुकेश आणि साथीदारांविरुद्ध ५० हजार हिसकावून घेत खंडणी मागितल्याची तक्रार केली.(प्रतिनिधी)भ्रष्ट पोलिसांची साथ मुकेशविरुद्ध ही तक्रार दाखल होताच शहरातील काही कुख्यात गुंड आणि बुकी त्याला वाचविण्यासाठी धावले. काही भ्रष्ट पोलिसांचीही त्यांनी साथ मिळवल्याची चर्चा आहे. या सर्वांनी मुकेशविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये म्हणून जोरदार मोर्चेबांधणी केल्यामुळे लकडगंज पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात विचारणा केली असता चौकशी सुरू असल्याचे पोलीस सांगतात. शाहूला संरक्षण नाकारलेनागपूर : मुकेश शाहूचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. या निर्णयाविरुद्ध त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सोमवारी त्याला दिलासा देण्यास नकार दिला. यामुळे त्याने याचिका मागे घेतली. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शाहूविरुद्ध अलीकडच्या काळात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे पोलिसांनी त्याचे संरक्षण काढून घेतले आहे. प्राणाला धोका असल्यामुळे पोलीस संरक्षण परत करण्याची विनंती शाहूने केली होती. शासनाने त्यावर न्यायालयात उत्तर सादर करून संरक्षण मागे घेण्यासंदर्भातील कारणे स्पष्ट केली.