शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागात बदली बॉम्ब!

By admin | Updated: September 4, 2016 02:57 IST

राज्याच्या महसूल व वन विभागाच्यावतीने राज्यभरातील तब्बल ३१ भारतीय वन सेवेतील (आयएफएस)

३१ आयएफएस अधिकाऱ्यांचा समावेश : गैरोला एफडीसीएमचे नवे व्यवस्थापकीय संचालक नागपूर : राज्याच्या महसूल व वन विभागाच्यावतीने राज्यभरातील तब्बल ३१ भारतीय वन सेवेतील (आयएफएस) आणि चार महाराष्ट्र वन सेवेतील अशा एकूण ३५ अधिकाऱ्यांचे पदोन्नतीसह बदली आदेश जारी केले आहे. यात दोन प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ), सहा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (एपीसीसीएफ), दहा मुख्य वनसंरक्षक (सीसीएफ) व पाच वनसंरक्षक (सीएफ), आठ उपवनसंरक्षक (डीसीएफ) आणि चार विभागीय वन अधिकारी (डीएफओ) दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांत प्रथमच भारतीय वन सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने बदल्या झाल्याचे दिसून येत आहे. शासनाने जारी केलेल्या बदली आदेशानुसार सामाजिक वनीकरण विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा अतिरिक्त महासंचालक ए. आर. चढ्ढा यांना प्रधान मुख्य वनसंरक्षक म्हणून पदोन्नती देऊन, त्याच विभागात बसविण्यात आले आहे. तर नागपुरातील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा केंद्रस्थ अधिकारी डॉ. सुरेश गैरोला यांना मात्र प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी पदोन्नती देऊन त्यांची महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून वर्णी लागली आहे. तसेच महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक जी. साईप्रकाश यांची केंद्रस्थ अधिकारी म्हणून डॉ. सुरेश गैरोला यांच्या जागी बदली झाली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे सदस्य सचिव अनुराग चौधरी यांची महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक म्हणून, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संसाधन उपयोग) बी. पी. सिंग यांची अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) पदी, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रामबाबू यांची अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पूर्व, नागपूर येथे, पुणे येथील शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांची सामाजिक वनीकरण विभागात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी, नागपुरातील महाराष्ट्र राज्य बांबू मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक सुनीता सिंग यांची अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (नियोजन व व्यवस्थापन वन्यजीव) येथे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपमहासंचालक महिप गुप्ता यांची महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकपदी, औरंगाबाद येथील वनसंरक्षक (कार्य आयोजना) व्ही. जे. वरवंटकर यांची मुख्य वनसंरक्षक (संसाधन उपयोग) येथे, पुणे येथील वनसंरक्षक (कार्य आयोजना) एम. सी. गणात्रा यांची मुख्य वनसंरक्षक भूमी अभिलेख, नागपूर, येथे नाशिक येथील मुख्य वनसंरक्षक (प्रा.) अरविंद पाटील यांची मुख्य वनसंरक्षक (वन संवर्धन), नागपूर येथे, नाशिक येथील वनसंरक्षक (वन्यजीव) एस. व्ही. रामाराव यांची मुख्य वनसंरक्षक (प्रा.) नाशिक येथे, चंद्रपूर येथील मुख्य वनसंरक्षक (प्रा.) संजय ठाकरे यांची सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नागपूर येथे, कोल्हापूर येथील वनसंरक्षक (कार्य आयोजना) व्ही. एस. शेळके यांची मुख्य वनसंरक्षक (प्रा.) चंद्रपूर येथे, औरंगाबाद येथील सामाजिक वनीकरण विभागाचे उपमहासंचालक जी. टी. चव्हाण यांची मुख्य वनसंरक्षक (कार्य आयोजना) नागपूर, येथे व पुणे येथील सामाजिक वनीकरण विभागाचे उपमहासंचालक सर्फराज खान यांची महासंचालक कुंडल अकॅडमी येथे बदली करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)