शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलि सोसायटी अध्यक्षाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2015 02:21 IST

वेकोलि वर्कर्स क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षाचा अनोळखी तीन व्यक्तींनी धारदार शस्त्राने निर्घृण खून केला.

सावनेर / खापरखेडा : वेकोलि वर्कर्स क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षाचा अनोळखी तीन व्यक्तींनी धारदार शस्त्राने निर्घृण खून केला. ही घटना पाटणसावंगी येथे शुक्रवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास घडली. खुनाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, मृताच्या घरासमोर तसेच मेडिकलमध्ये त्यांच्या आप्तस्वकीयांनी मोठी गर्दी केली होती. चिरकुट मोजे (५७) रा. पाटणसावंगी ह.मु. झिंगाबाई टाकळी, नागपूर असे मृताचे नाव आहे. त्यांचे पाटणसावंगीच्या हायवे चौकात राजहंस मंगल कार्यालय आणि लॉन आहे. तेथे कार्यक्रम सुरू होता. त्या कार्यक्रमात काही परिचित मित्रांसोबत ते होते. थोडा फेरफटका मारावा या उद्देशाने ते मित्रांसोबत सत्यम बारकडे पायी जाण्यास निघाले. दरम्यान घटनास्थळी तीन व्यक्ती आधीच दबा धरून तोंडावर रुमाल बांधून बसलेल्या होत्या. ते चिरकुट यांची येण्याची वाट बघत होते. तेथे जाताच त्या अनोळखी व्यक्तींनी धारदार शस्त्राने चिरकुट यांच्या मानेवर आणि पोटावर सपासप वार केले. त्यांच्या पोटाच्या आतड्या बाहेर निघून ते घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडले. याचवेळी आरोपींपैकी एकाने माऊझरमधून एक राऊंड फायर केला. यामुळे चिरकुट यांच्यासोबत असलेल्यांनी तेथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या चिरकुट यांच्याकडे पाहिल्यावर मृत्यू झाल्याची शक्यता वाटताच आरोपी तेथून अ‍ॅक्टिवाने पसार झाले.आरोपी पसार होताच लोकांनी आरडाओरड केली आणि चिरकुट यांना लगेच आॅरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये भरती केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तेथून मेडिकलमध्ये हलविले. त्यांच्या आप्तस्वकीयांना तसेच सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती होताच ते मेडिकलमध्ये हजर झाले. चिरकुट मोजे यांना पत्नी, दोन मुली आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून लहान मुलगी ही त्यांनी स्थापन तयार केलेल्या सोसायटीत सचिव आहे. (प्रतिनिधी)