शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लॉकडाऊनमध्येही रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 01:00 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यानंतरही रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरुच आहे. लॉकडाऊनमध्ये केवळ श्रमिक स्पेशल, राजधानी एक्स्प्रेस रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. परंतु १ जूनपासून १०० जोड्या रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केल्यामुळे रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणारे सक्रिय झाले आहेत.

ठळक मुद्दे७ ई - तिकिटांसह ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यानंतरही रेल्वेतिकिटांचा काळाबाजार सुरुच आहे. लॉकडाऊनमध्ये केवळ श्रमिक स्पेशल, राजधानी एक्स्प्रेस रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. परंतु १ जूनपासून १०० जोड्या रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केल्यामुळे रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणारे सक्रिय झाले आहेत.अशाच एका रेल्वेच्या दलालास रेल्वे सुरक्षा दलाने जाळे टाकून अटक केली. त्याच्या जवळून ७ आरक्षण तिकिटांसह ५४ हजार ८९४ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. गुरुवारी आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पाण्ड्येय यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ अजनीचे निरीक्षक हरिमोहन निरंजन, प्रधान आरक्षक वीरेश उपाध्याय, जवान अश्विन पवार, अमित बारापात्रे यांनी शहर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. त्यानुसार बुटीबोरी येथील वैभव हाईट २ इमारतीच्या रिद्धी-सिद्धी इंटरनेटवर धाड टाकली. तेथे सापडलेल्या इसमांनी आपले नाव आनंद सदानंद (३५) रा. प्रसाद कॉलनी, बुटीबोरी सांगितले. रेल्वे तिकिटांच्या काळाबाजाराबाबत विचारले असता त्याने टाळाटाळ केली. त्यावर दोन पंचासमक्ष त्याचा लॅपटॉप सुरू केला असता वेगवेगळ्या सहा तिकिटांच्या बनावट आयडी मिळाल्या. तो टाळाटाळ करीत होता. त्यानंतर ७६४४ रुपयांच्या तिकिटांची प्रिंट काढण्यात आली. याबाबत कठोरपणे विचारले असता त्याने आयआरसीटीसीच्या परवान्याचा फायदा घेऊन बनावट आयडीच्या आधारे प्रवाशांकडून २०० ते ३०० रुपये कमिशन घेऊन तिकीट देत असल्याचे मान्य केले. त्यावर लॅपटॉपवर मिळालेल्या ६ आरक्षणाचे तिकीट, १ लॅपटॉप, १ प्रिंटर, रोख १२५० सह ५४ हजार ८९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर आरोपीला अजनी ठाण्यात आणून रेल्वे अ‍ॅक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

टॅग्स :railwayरेल्वेticketतिकिटArrestअटक