'उद्योगपतींच्या पैशावर भाजपाचा पक्ष जिवंत'; शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 13:50 IST2022-03-23T13:44:37+5:302022-03-23T13:50:22+5:30

भाजपाच्या नेत्यांकडे काहीच पैसे नाही, तर ते काय भीक मागत आहे का?, असा सवाल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते नागपूरात बोलत होते. 

'BJP party alive on industrialists' money'; Shiv Sena leader Sanjay Raut claims | 'उद्योगपतींच्या पैशावर भाजपाचा पक्ष जिवंत'; शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा दावा

'उद्योगपतींच्या पैशावर भाजपाचा पक्ष जिवंत'; शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा दावा

नागपूर- राज्यात ईडीच्या कारवायांवरून वादंग असतानाच आता ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केल्यानं खळबळ माजली आहे. ईडीने पाटणकर यांच्या ठाण्यातील ११ सदनिका जप्त केल्या आहेत. 

श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या या कंपनीच्या मालकीच्या या सदनिका होत्या. हमसफर कंपनीकडून विनातारण पाटणकर यांच्या कंपनीला कर्ज देण्यात आलं होते. याच प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. ईडीच्या या कारवाईवरून राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दबाव आणला जात आहे. ईडीचे अधिकारी फक्त आमच्याच मागे लागले म्हणे आमच्याकडे पैसे आहे, भाजपाच्या नेत्यांकडे काहीच पैसे नाही, तर ते काय भीक मागत आहे का?, असा सवाल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते नागपूरात बोलत होते. 

देशातले सगळे उद्योगपती, हवालावाले ज्यांच्या पैशावर भाजपचा पक्ष जिवंत आहे. सरकार चालत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना हे जर दिसत नसेल तर त्यांचा चष्म्याचा नंबर हा बदलावा लागेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. 

दरम्यान, ईडीने दिलेल्या माहितीनुसार, पुष्पक ग्रुपची कंपनी असलेल्या पुष्पक बुलियनविरोधात मार्च २०१७ मध्ये काळ्या पैशांबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर, पुष्पक बुलियन्सच्या २१.४६ कोटींच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली होती. ही मालमत्ता महेश पटेल, चंद्रकांत पटेल व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित होती. महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी याच्या संगनमताने पुष्पक समूहातील पुष्पक रियल्टीचा निधी हस्तांतरित केला. पुष्पक रियल्टी डेव्हलपरने विक्रीच्या नावे हा निधी हस्तांतरित केला होता. यातूनच पुढे, चतुर्वेदीच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांना २०.०२ कोटींचे हस्तांतरण केले गेले.

उद्धव ठाकरेंना झोप लागणार नाही– किरीट सोमय्या

पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्यांनी यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सरकार माफिया सरकार आहे. श्रीधर पाटणकर यांच्या बँक खात्यातून पुढे कुणाला पैसे ट्रान्सफर झाले. त्याची माहिती जनतेसमोर आल्यास उद्धव ठाकरेंची झोप उडेल. पुढील काळात सर्व भ्रष्टाचाराचा हिशोब होणार असं त्यांनी सांगितले.

Web Title: 'BJP party alive on industrialists' money'; Shiv Sena leader Sanjay Raut claims