शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

अखेर भाजप नेत्या सना खान यांचा मृतदेह सापडला? पोलिस पथकासह सनाचे नातेवाईक रवाना

By दयानंद पाईकराव | Updated: August 16, 2023 15:53 IST

मृतदेह सना यांच्या वर्णनाशी जुळत असल्याची माहिती

नागपूर : भाजप नेत्या सना खान यांचा मृतदेह तब्बल १४ दिवसांनंतर बुधवारी पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे. नागपूर आणि जबलपूर पोलिसांसह सना यांचे नातेवाईक सिहोर गावाकडे रवाना झाले आहेत. मृतदेह फेकल्याच्या स्थळापासून जवळपास ३०० किलोमीटर दूर अंतरावर मृतदेह मिळून आला असून तो सना खान यांचाच मृतदेह आहे की नाही, याची त्यांच्या नातेवाईकांकडून ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

भाजपच्या अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकारी सना खान यांचा तथाकथित प्रियकर जबलपूरमधील कुख्यात गुंड अमित शाहू याने २ आॅगस्टला खून केला होता. सना यांचा मृतदेह कारने कटंगीजवळील पुलावरून हिरन नदीत फेकला होता. हिरन नदीचा ३ किलोमीटरनंतर नर्मदा नदीशी संगम आहे. त्यामुळे सना यांचा मृतदेह खूप दूरपर्यंत वाहून गेल्याची शक्यता होती. नागपूर आणि जबलपूर पोलीस सना यांच्या मृतदेहाचा शोध घेत होते.

बुधवारी सकाळी घटनास्थळाच्या जवळपास ३०० किमी अंतरावर सिहोर गावाजवळील नर्मदा नदीच्या काठावर सना यांचा मृतदेह मिळाला. नागपूर पोलिसांचे एक पथक आणि सना खान यांचे नातेवाईक लगेच सिहोर गावाकडे रवाना झाले आहेत. सापडलेल्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही. तो मृतदेह सना खान यांचाच आहे किंवा अन्य कुण्या महिलेचा आहे, याबाबत पोलीस संभ्रमात आहेत. परंतु मिळालेल्या मृतदेहाचे वर्णन सना खाना यांच्याशी जुळत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरBJPभाजपाjabalpur-pcजबलपुर