शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भाजप छुपा अजेंडा राबवतेय

By admin | Updated: July 9, 2015 03:02 IST

राज्यात आघाडीची सत्ता असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरून ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी

अजित पवार यांचा आरोप : भ्रष्टाचारी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा नागपूर : राज्यात आघाडीची सत्ता असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरून ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेते करीत होते. परंतु भाजप-शिवसेना युतीच्या सात महिन्याच्या राजवटीत राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. दुबार पेरणीचे संकट असूनही शेतकऱ्यांना मदत नाही. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. अशा जनहिताच्या प्रश्नावरून १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी विदर्भातील इच्छुकांच्या रविभवन येथे मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, मनोहर नाईक, रमेश बंग आदी उपस्थित होते. लोकांना अच्छे दिन येणार असल्याचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजप नेतृत्वातील सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. केंद्र व राज्य सरकारमधील दिग्गज नेत्यांची भ्रष्टाचाराची नवनवी प्रकरणे पुढे येत असल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. चौकशीत निर्दोष आढळल्यास पुन्हा पदावर यावे. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना नेत्यांना भ्रष्टाचार बोकाळाल्याचे दिसत आहे. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारचे धिंडवडे काढल्याचे त्यांनी सांगितले.आघाडी सरकारच्या काळात कापूस व धानाला भाव दिला होता. परंतु भाजप सरकारला यात अपयश आले आहे.दुधाचे भाव २५ रुपयावरुन १६ रुपयावर आले आहे. पाण्यापेक्षा दूध स्वस्त झाल्याने दूध उत्पादक चिंतेत आहे. त्यातच राज्यात दुबार पेरणीचे असूनही शेतकऱ्यांना पीक कर्ज न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांना डोक्यावर घेतलेल्या विदर्भातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. म्हणूनच . भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना नाकारल्याचे पवार म्हणाले. सुरुवातीला आम्ही सरकारवर टीका केली नाही. सहा महिने संधी दिली. परंतु सरकारला सर्वच क्षेत्रात अपयश आल्याचे पवार म्हणाले.(प्रतिनिधी)