शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भाजपकडून मनपाच्या उमेदवारांची चाचपणी सुरू, प्रमुख कार्यकर्त्यांसोबत ‘वन टू वन’ चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 23:58 IST

मागील साडेतीन वर्षांपासून निवडणूक न झाल्याने भाजपकडे ३८ ही प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे.

- योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे. भाजपकडून प्रत्येक प्रभागात स्वतंत्र सर्वेक्षण तर सुरूच आहे. सोबतच पक्षाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांकडून सर्वच प्रभागांतील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत ‘वन टू वन’ चर्चेला सुरुवात झाली आहे. पुर्व नागपुरात यासंदर्भात सत्रांचे आयोजन करण्यात आले होते व यात प्रभागांतील पदाधिकारी-प्रमुख कार्यकर्त्यांकडून कोणता चेहरा प्रभावी उमेदवार होऊ शकतो हे जाणून घेण्यात आले.

मागील साडेतीन वर्षांपासून निवडणूक न झाल्याने भाजपकडे ३८ ही प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. माजी नगरसेवकांसोबतच तरुणतुर्क पदाधिकारीदेखील निवडणूक लढविण्यासाठी सज्ज आहेत. प्रभागातून कुणाला तिकीट मिळेल याबाबत विविध कयास लावण्यात येत असून प्रत्येक जण आपापल्या परिने ‘सेटिंग’च्या व्यवस्थेत आहे. दुसरीकडे पक्षाकडून दमदार उमेदवारांची नावे अंतिम करण्यात येत आहेत. याअंतर्गतच पुर्व नागपुरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून ‘वन टू वन’ चर्चांची सुरुवात झाली. वर्धमान मंडळ, पारडी मंडळ व वाठोडा मंडळाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बोलविण्यात आले.

माजी आमदार मिलिंद माने यांनी वर्धमान मंडळातील प्रभाग ५, २१, २२ व २३, माजी आमदार अनिल सोले यांनी पारडी मंडळातील प्रभाग ४,२४ व २५ तर भाजपचे कोषाध्यक्ष राजेश बागडी यांनी वाठोडा मंडळातील प्रभाग २६,२७ व २८ मधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सर्वांना वैयक्तिकपणे बोलविण्यात आले व त्यांची मते जाणण्यात आली. त्यावेळी पुर्व नागपुरातील इतर पदाधिकारी किंवा सदस्य तिथे उपस्थित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती.

सर्वांची मते लिफाफ्यात बंदया ‘वन टू वन’ चर्चेदरम्यान अनेक इच्छुकांनी स्वत:च्या उमेदवारीचे दावे सादर केले. तीनही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून सर्वांची मते बंद लिफाफ्यात टाकून तो अहवाल शहर कार्यकारिणीकडे पाठविण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP assesses Nagpur candidates for municipal elections with one-on-one discussions.

Web Summary : BJP is surveying potential municipal election candidates in Nagpur, holding individual discussions with key workers to identify strong contenders. Senior officials are gathering opinions from ward leaders, with reports submitted to the city committee for final selection.
टॅग्स :BJPभाजपाnagpurनागपूर