विको कॉस्मेटिक कंपनीला मोठी आग; हिंगणा एमआयडीसीतील प्लांटला 70 टक्के नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 12:13 PM2021-03-08T12:13:08+5:302021-03-08T12:15:34+5:30

vicco cosmetics Company : रविवारी रात्री कंपनीच्या आवारातून मोठ्या प्रमाणात धूर निघायला सुरुवात झाल्याने आग लागल्याचे स्पष्ट झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ६,  एमआयडीसी येथील २, वाडी नगर परिषद व कळमेश्वर नगर परिषदेच्या प्रत्येकी एक अशा १० गाड्या घटास्थळी दाखल झाल्या.

Big fire to vicco cosmetics Company; 70 per cent damage to plant at Hingana MIDC | विको कॉस्मेटिक कंपनीला मोठी आग; हिंगणा एमआयडीसीतील प्लांटला 70 टक्के नुकसान

विको कॉस्मेटिक कंपनीला मोठी आग; हिंगणा एमआयडीसीतील प्लांटला 70 टक्के नुकसान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : एमआयडीसी परिसरात असलेल्या विको कंपनीला रविवारी (दि. 7) रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत प्राणहानी झाली नसली तरी कंपनीचे 70 टक्के नुकसान झाल्याची माहिती संबंधित व्यक्तींनी दिली. (fire at vicco cosmetics Company)


रविवारी रात्री कंपनीच्या आवारातून मोठ्या प्रमाणात धूर निघायला सुरुवात झाल्याने आग लागल्याचे स्पष्ट झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ६,  एमआयडीसी येथील २, वाडी नगर परिषद व कळमेश्वर नगर परिषदेच्या प्रत्येकी एक अशा १० गाड्या घटास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी अथक प्रयत्न करीत ही आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या आगीत प्राणहानी झाली नाही परंतु आगीत कंपनीचे ७० टक्के नुकसान झाले. या कंपनीमध्ये कॉस्मेटिक्सची उत्पादनने तयार केली जातात.

Read in English

Web Title: Big fire to vicco cosmetics Company; 70 per cent damage to plant at Hingana MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.