शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

मोठा दणका ! शेतरस्ते अडवल्यास ५ वर्षे सरकारी योजना बंद; महसूलमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 14:33 IST

Nagpur : राज्य सरकारने ग्रामीण भागातील रस्ते आणि महसूल विभागातील पारदर्शकतेसाठी अत्यंत टोकाचे पाऊल उचलले आहे. "जे शेतकरी पांदण किंवा शेतरस्ते अडवतील, त्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी तब्बल ५ वर्षांसाठी ब्लॉक केले जातील," अशी खळबळजनक घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

नागपूर: राज्य सरकारने ग्रामीण भागातील रस्ते आणि महसूल विभागातील पारदर्शकतेसाठी अत्यंत टोकाचे पाऊल उचलले आहे. "जे शेतकरी पांदण किंवा शेतरस्ते अडवतील, त्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी तब्बल ५ वर्षांसाठी ब्लॉक केले जातील," अशी खळबळजनक घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. यामुळे संबंधित शेतकरी सर्व प्रकारच्या शासकीय योजना आणि मदतीसाठी अपात्र ठरणार आहेत. ​नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी महसूल विभागातील जमीन घोटाळे, इंधन कपात आणि नवीन नियमावलीवर सविस्तर भाष्य केले.

शेतरस्ते अडवणाऱ्यांवर 'डिजिटल' कारवाई

  • ​'मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजने'ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने कडक नियमावली तयार केली आहे
  • ५ वर्षे बहिष्कार: रस्ता अडवल्यास किंवा सार्वजनिक रस्त्याचे नुकसान केल्यास ५ वर्षे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • ​७ दिवसांचा अल्टिमेटम: गाव नकाशावरील रस्त्यांवर अतिक्रमण असल्यास तहसीलदार संबंधित व्यक्तीला ७ दिवसांची नोटीस देतील. मुदतीत अतिक्रमण न हटवल्यास शासन स्तरावरून कारवाई केली जाईल.
  • सर्व्हिस रोडची हमी: हायवे किंवा रेल्वे प्रकल्पामुळे ज्यांचे रस्ते बंद झाले आहेत, त्यांना 'राईट ऑफ वे' नुसार सरकार सर्व्हिस रोड उपलब्ध करून देणार आहे.

 

पुणे आणि कोकणात मोठा जमीन घोटाळा उघड

  • पुणे विभागात कलम १५५ चा गैरवापर करून जमिनी हडपण्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. याबाबत मंत्री म्हणाले:
  • ४००० प्रकरणांची चौकशी: पुण्यात सुमारे ४००० प्रकरणांची तपासणी झाली असून, ४०० प्रकरणांत गंभीर गैरप्रकार आढळले आहेत.
  • अधिकाऱ्यांवर कारवाई: अनेक महसूल अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत.
  • विशेष पथक: अन्याय झालेल्या गरीबांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. कोकणातही अशाच प्रकारची चौकशी सुरू आहे.

 

​मुंडवा जमीन प्रकरण: ३००० कोटींची मालमत्ता जप्त

​पुणे मुंडवा जमीन घोटाळ्यात सरकारने कोणालाही 'क्लिनचिट' दिलेली नाही. या प्रकरणात सुमारे ३००० कोटी रुपयांची मालमत्ता सरकारने स्वतःच्या ताब्यात घेतली असून बनावट नोंदी रद्द केल्या आहेत. विजय वडेट्टीवार यांनी यावर राजकारण करू नये, असेही त्यांनी सुनावले.

​इतर महत्त्वाचे निर्णय

  • ​इंधन दरकपात: केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केल्यामुळे महागाईपासून दिलासा मिळाला असून पंतप्रधान मोदींचे त्यांनी आभार मानले.
  • मंदिर जमीन नोंदणी: जमिनी दान करताना आता स्टॅम्प ड्युटी माफ केली जाईल, ज्यामुळे मंदिरांच्या मालमत्ता अधिकृतपणे नोंदवणे सोपे होईल.
  • अशोक खरात प्रकरण: खरात यांच्या संपर्कात असलेल्या महसूल अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून पुढील आठवड्यात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Major Blow: Obstruct farm roads, face 5-year ban on schemes!

Web Summary : Farmers blocking farm roads will face a five-year ban from government schemes. Revenue Minister Bawankule announced strict action against land scams and illegal land grabbing, including action in Pune and Konkan. The government has seized assets worth ₹3000 crore in Mundhwa land scam.
टॅग्स :nagpurनागपूरChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेFarmerशेतकरीfarmingशेतीGovernmentसरकार