शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

भदंतला १० वर्षे सश्रम कारावास

By admin | Updated: November 10, 2015 03:45 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भंडारा जिल्ह्यातील हत्याप्रकरणात आरोपी भदंतला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी चंद्रमणीनगर, नागपूर येथील रहिवासी आहे.

हायकोर्ट : भंडारा जिल्ह्यातील हत्याप्रकरणनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भंडारा जिल्ह्यातील हत्याप्रकरणात आरोपी भदंतला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी चंद्रमणीनगर, नागपूर येथील रहिवासी आहे.कैलाश बाबुराव गावंडे (४९) असे आरोपीचे नाव असून भदंत झाल्यानंतर त्याचे नाव धम्मानंद ठेवण्यात आले. मृताचे नाव कोल्हू सीतारू चहांदे होते. तो ढोलसर येथे रहात होता. २१ फेब्रुवारी २००७ रोजी आरोपी हा चहांदेच्या घरी मुक्कामाने गेला होता. मध्यरात्रीनंतर वाद झाल्यामुळे आरोपीने चहांदेची लोखंडी रॉडने मारून हत्या केली. चहांदेला वाचवायला आलेली त्याची पत्नी आनंदाबाईलाही आरोपीने जखमी केले होते.२८ एप्रिल २००९ रोजी भंडारा सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती. या आदेशाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रसन्न वराळे यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीला भादंविच्या कलम ३०२ ऐवजी कलम ३०४-१ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत दोषी ठरवले व जन्मठेप रद्द करून १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायालयाचा अन्य आदेश कायम ठेवला. उच्च न्यायालयाने हा निवाडा देताना आरोपीचा हत्या करण्याचा उद्देश नव्हता असा निष्कर्ष नोंदविला आहे. सत्र न्यायालयात सरकारी पक्षाने ११ साक्षीदार तपासले होते. लाखांदूर पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला होता.(प्रतिनिधी)