शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ‘ओएलएक्स’ मध्ये सायबर गुन्हेगारांची घुसखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 20:17 IST

ओएलएक्सवर दुचाकीची खरेदी करू पाहणाऱ्या एका तरुणाची सायबर गुन्हेगाराने फसवणूक करून ३८ हजार रुपये लंपास केले. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ठळक मुद्दे दुचाकी खरेदीचे स्वप्न भंगले , फसवणूक : गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ओएलएक्सवर दुचाकीची खरेदी करू पाहणाऱ्या एका तरुणाची सायबर गुन्हेगाराने फसवणूक करून ३८ हजार रुपये लंपास केले. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, ५ जुलैला ११ वाजता त्याने त्याच्या मोबाईलवर ओएलएक्स अ‍ॅपवर विकास पटेल नामक आरोपीची अ‍ॅक्टिव्हा विकायची आहे, अशी जाहिरात बघितली. तेथे नमूद मोबाईल क्रमांकावर पीडित व्यक्तीने संपर्क केला. आरोपी पटेलने आपण आर्मीमध्ये आहे, असे सांगून स्वत:चे बनावट ओळखपत्रही पाठवले. १७ हजार रुपयात अ‍ॅक्टिव्हा विकण्याचा सौदा करून आरोपीने फोन पे वरून फिर्यादीला प्रारंभी २१५० रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीच्या दुसऱ्या साथीदाराने दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क करून रक्कम ट्रान्सफर करायला सांगितली. एकूण ११,९९९ रुपये ट्रान्सफर केल्यानंतर आरोपीने युनियन बँकेचे एटीएम कार्ड दोन्हीकडून झेरॉक्स करून पाठवण्यास सांगितले. ते पाठविल्यानंतर पीडित तरुणाच्या बहिणीच्या नावाने असलेल्या बँक खात्यातूनही आरोपींनी १८,९८९ रुपये काढून घेतले. त्यानंतरही वेगवेगळे कारण सांगून एकूण ३८ हजारांची रक्कम उकळली. अशाप्रकारे रक्कम घेतल्यानंतर दुचाकी मात्र दिलीच नाही. त्याबाबत तगादा लावल्याचे पाहून आरोपीने संपर्क क्रमांक बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. चौकशीअंती या प्रकरणात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी