मित्रानेच केला विश्वासघात, लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार

By योगेश पांडे | Updated: September 4, 2023 17:20 IST2023-09-04T17:18:37+5:302023-09-04T17:20:10+5:30

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Betrayed by a friend, sexually abused minor girl by showing lure of marriage | मित्रानेच केला विश्वासघात, लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार

मित्रानेच केला विश्वासघात, लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार

नागपूर : ज्या मित्रावर कुटुंबियांहून जास्त विश्वास दाखविला त्यानेच एका अल्पवयीन मुलीसोबत विश्वासघात केला. त्याने लग्नाचे आमिष दाखवत मुलीवर अत्याचार केले. मुलीला पोटात त्रास होत असल्याने पालकांनी दवाखान्यात नेले असता ती गर्भवती असल्याचे समजले व बिंग फुटले. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

सिद्धार्थ हरिश्चंद्र देशभ्रतार (२४, वाठोडा) असे आरोपीचे नाव आहे. त्याची एका १७ वर्षीय मुलीशी मैत्री होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व मे महिन्यात तिच्या घरी पोहोचला. तिच्या घरी कुणीच नसल्याचा फायदा उचलत त्याने तिला लग्नाचे वचन दिले व तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर अनेकदा त्याने असा प्रकार केला. काही दिवसांअगोदर मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्या. तिच्या पालकांनी तिला मेडिकल इस्पितळात नेले असता ती गरोदर असल्याची बाब समोर आली. तिच्या पालकांनी विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. पालकांनी केलेली तक्रार व वैद्यकीय सूचनेवरून वाठोडा पोलीस ठाण्यात आरोपी सिद्धार्थविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Web Title: Betrayed by a friend, sexually abused minor girl by showing lure of marriage