धम्मदीक्षेने होणार सोहळ्याला सुरुवात

By Admin | Updated: September 18, 2014 00:49 IST2014-09-18T00:49:10+5:302014-09-18T00:49:10+5:30

दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य समारंभाची सुरुवात धम्मदीक्षा सोहळ्याने होणार आहे. भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देतील.

The beginning of the ceremony will be held by Dhamdekshi | धम्मदीक्षेने होणार सोहळ्याला सुरुवात

धम्मदीक्षेने होणार सोहळ्याला सुरुवात

नागपूर : दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य समारंभाची सुरुवात धम्मदीक्षा सोहळ्याने होणार आहे. भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देतील.
धम्मचक्र प्रतर्वन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर दरवर्षी लाखो बौद्ध आंबेडकरी अनुयायी येतात. यासोबतच अनेक जण बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी सुद्धा येतात. त्यापार्श्वभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुवर्णजयंती वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे परिसरात धम्मदीक्षा सोहळा आयोजित केला जातो. भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्त्वात भिक्खू संघातर्फे इच्छुकांना बौद्ध धम्माची दीक्षा व २२ प्रतिज्ञा दिल्या जातात. यासोबतच स्मारक समितीतर्फे दीक्षा घेतल्याचे प्रमाणपत्र सुद्धा दिले जाते. दरवर्षी हजारो लोकं बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी दीक्षाभूमीवर येतात.
५० लाख रुपयांमधून सीसीटीव्ही कॅमेरे
सुरक्षेच्या दृष्टीने दीक्षाभूमी परिसरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे हे कॅमेरे लावण्यात येणार असून यासाठी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Web Title: The beginning of the ceremony will be held by Dhamdekshi