शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

होळी साजरी करताना काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये, यासाठी होळी पेटविताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये, यासाठी होळी पेटविताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत होळी साजरी करा.

होळी पेटविताना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहित्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या, अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडून भीषण अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या या भूमिगत असल्याने, त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी, जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील. होळी पेटविताना शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा. ट्रक किंवा इतर वाहनातून होळीचे लाकडे आणताना स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही, याची खबरदारी घ्या. विजेचे अपघात हे प्राणघातक असल्याने एक चूकही प्राणांकित अपघातास कारणीभूत ठरू शकते.

त्याचप्रमाणे रंगोत्सव साजरा करताना पाण्याचे फवारे वीजवाहिन्यापर्यंत उडणार नाही, याची काळजी घ्या. रंग भरलेले फुगे फेकताना ते विजेचे खांब आणि वीजवाहिन्या यांना लागणार नाही, याची खबरदारी घ्या. ओले कपडे, ओल्या चिंध्या विजेच्या तारावर फेकण्याचे टाळावे, कारण अशा ओल्या कपड्यांमुळे दोन फेजमध्ये शॉर्टसर्किट होऊन वीज पुरवठा खंडित होतो. तसेच वीजवाहिन्यावर-तारांवर अशा कपड्यांमुळे पावसाळ्यात दोन फेजमध्ये शॉर्टसर्किट होऊन वीज पुरवठा खंडित होतो. विशेषत: बालकांना रंगोत्सव साजरा करताना सांभाळून व मोठ्यांच्या निगराणीखाली वीजयंत्रणापासून लांब ठेवून साजरा करू द्यावा. वीज वितरण यंत्रणेची रोहित्रे व तत्सम वितरण उपकरणे बसविलेल्या जागेपासून लांब अंतरावरच रंग खेळा. रंग खेळताना ओल्याचिंब शरीराने वीजखांबाला स्पर्श झाल्यास अपघाताचा संभाव्य धोका असल्याने विजेच्या खांबांना स्पर्श करू नका. विजेच्या खांबासभोवती पाण्याचा निचरा होणार नाही, याची खबरदारी घ्या.