शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! नागपूरसाठी धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:12 IST

उपराजधानीची गणना देशातील ‘ग्रीन’ शहरात होत असली तरी ‘वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन’ने जारी केलेली आकडेवारी भविष्यातील धोक्यांचे संकेत देणारी आहे. ‘पीएम २.५’च्या प्रमाणानुसार देशातील प्रदूषित शहरांमध्ये नागपूरचा क्रमांक १६ व्या स्थानी आहे. २०१३ ते २०१६ या कालावधीत शहरात ‘पीएम २.५’चे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देवायूप्रदूषणात नागपूर देशात १६ व्या स्थानी : ‘वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन’चा अहवाल : सातत्याने वाढतेय ‘पीएम २.५’चे प्रमाण

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीची गणना देशातील ‘ग्रीन’ शहरात होत असली तरी ‘वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन’ने जारी केलेली आकडेवारी भविष्यातील धोक्यांचे संकेत देणारी आहे. ‘पीएम २.५’च्या प्रमाणानुसार देशातील प्रदूषित शहरांमध्ये नागपूरचा क्रमांक १६ व्या स्थानी आहे. २०१३ ते २०१६ या कालावधीत शहरात ‘पीएम २.५’चे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.वायूप्रदूषणासंदर्भात ‘पीएम २.५’ हे ‘पीएम १०’पेक्षा जास्त घातक मानण्यात येतात. नागपुरातील ‘पीएम २.५’चे प्रमाण २०१३ साली ३३ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतके होते. २०१४ मध्ये हेच प्रमाण ३४ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटरवर गेले. तर २०१६ हाच आकडा चक्क ८४ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटरवर पोहोचला. ‘पीएम २.५’च्या प्रमाणानुसार नागपुरचा देशातील प्रदूषित शहरांमध्ये १६ वा क्रमांक लागतो. ‘वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन’ची निर्धारित पातळी १० मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतकी आहे तर भारतात ही पातळी ४० मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतकी आहे. या पातळीहून नागपुरात हे प्रमाण फार जास्त आहे.‘पीएम १०’चे प्रमाणदेखील वाढीसत्याचप्रमाणे ‘पीएम १०’च्या प्रमाणानुसार नागपुरचा क्रमांक देशात २५ वा आहे. २०१३ साली ६१ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर, २०१४ मध्ये ६३ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर तर २०१६ मध्ये हेच प्रमाण ८६ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटरवर पोहोचले. ‘पीएम १०’चे प्रमाणदेखील वाढीस लागल्याचे चित्र आहे.काय आहेत ‘पीएम’हवेत असलेले अतिसूक्ष्म कण, धूळ, मातीचे कण, वायू इत्यादींचे मिश्रण होऊन ‘पीएम’ (पर्टिक्युलेट मॅटर) तयार होतात. ‘पीएम २.५’ (पर्टिक्युलेट मॅटर २.५ मायक्रॉन), ‘पीएम १०’ (पर्टिक्युलेट मॅटर १० मायक्रॉन) तसेच ‘एमएसपीएम’ (सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर) अशा ३ श्रेणींमध्ये विभाजित करण्यात येते. ‘पीएम २.५’ ला जास्त धोकादायक मानण्यात येते. याचा आकार २.५ मायक्रोमीटरहूनदेखील लहान असतो. हे सूक्ष्मकण श्वासनलिकेवाटे थेट शरीरात शिरण्याचा धोका असतो.

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणnagpurनागपूर