शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या राजभवनातही तळघर

By admin | Updated: August 19, 2016 02:27 IST

राज्यातील सर्वात मोठे राजभवन अशी नागपूरच्या राजभवनाची ओळख आहे. मुंबईतील राजभवनात ब्रिटिशकालीन भुयार सापडल्यानंतर...

मौलिक वस्तूंचा साठा : जैन तीर्थंकरांच्या मूर्ती, चांदीच्या भांड्यांचा समावेश वसीम कुरेशी नागपूर राज्यातील सर्वात मोठे राजभवन अशी नागपूरच्या राजभवनाची ओळख आहे. मुंबईतील राजभवनात ब्रिटिशकालीन भुयार सापडल्यानंतर नागपुरातील राजभवनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथील राजभवनातदेखील भुयार असून येथील तळघराला ‘सिल्व्हर गोडावून’ या नावाने ओळखले जाते. या तळघरात चांदीची अनेक किंमती भांडी ठेवली आहेत. याशिवाय येथे जैन धर्माच्या तीर्थंकरांच्या अनेक वर्षे जुन्या मूर्तीदेखील ठेवण्यात आल्या आहेत. १८९१ साली बनविण्यात आलेली ही दिमाखदार इमारत ब्रिटिश शासनकाळात सीपी अ‍ॅन्ड बेरार प्रांताच्या ‘हाय कमिश्नर’चे कार्यालय होती. एकूण २१ एकर परिसरातील या जागेत २२ हजार चौरस फुटात इमारतीचे बांधकाम झाले आहे. या इमारतीत ५० कक्ष आहेत. तर इमारतीच्या तळघरात १५ बाय १५ चे ३ कक्ष आहेत. ब्रिटिशांच्या काळापासूनच या तळघरात मौलिक मूर्ती व चांदीची भांडी ठेवली आहेत. इमारतीच्या काही कामासाठी १० वर्षांअगोदर राज्य पुरातत्व विभागाची परवानगी घेण्यात आली होती. यानंतर कुठल्याही बाहेरील ‘एजन्सी’ने इमारतीसंदर्भात कुठलीही माहिती घेतलेली नाही. ‘हेरिटेज’ समितीचा दावा खोटा रमेश येवले यांनी दिलेल्या माहितीनुसार या ‘हेरिटेज’ इमारतीचे प्रलेखन करायला कुणीही आलेले नाही. दुसरीकडे मनपाच्या ‘हेरिटेज’ समितीच्या पदाधिकारी उज्ज्वला चक्रदेव यांनी या इमारतीचे प्रलेखन झाले असल्याचा दावा केला आहे. या इमारतीला घेऊन राज्य पुरातत्व विभाग व भारतीय पुरातत्व सर्वेक्षणनेदेखील कुठलेही संशोधन केलेले नाही. तज्ज्ञांच्या मते अशा जागांवर अनेक विशेषता दिसून येऊन शकतील. उपग्रहाच्या छायाचित्रातूनदेखील काही गोष्टींची माहिती मिळते. परंतु राज्यपालांचे निवासस्थान असल्यामुळे येथे कुठल्याही प्रकारचे काम झालेले नाही. नागपुरातून मुंबईत जातात भांडी नागपूरचा राजवाडा या नावाने प्रसिद्ध असलेल्या राजभवनाच्या तळघरात ठेवण्यात आलेली भांडी विशेष प्रसंगी मुंबईच्या राजभवनात नेण्यात येतात. ही सर्व शाही भांडी असून यांचे वजन जास्त आहे. राजभवनाच्या तळघरात चांदीची भांडी व जैन तीर्थंकराच्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. यांची नियमितपणे स्वच्छता होते. आतापर्यंत येथे कुणीही कागदी कारवाईसाठी आलेले नाही, अशी माहिती राजभवनाचे अतिरिक्त ‘कंट्रोलर’ रमेश येवले यांनी दिली.