शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बार्टीचे अधिकारी-कर्मचारी संविधान दिंडीत मग्न, विद्यार्थी वाऱ्यावर

By आनंद डेकाटे | Updated: June 19, 2025 16:22 IST

हजारो विद्यार्थी जेईई, नीट प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत : विदेशी शिष्यवृत्तीच्या यादीचीही प्रतीक्षा

आनंद डेकाटे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधानाचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने बार्टीतर्फे यंदाही संविधान दींडी काढण्यात आली आहे. यासाठी बार्टीची संपूर्ण यंत्रणा कामाला आगली आहे. १९ जूनपासून सुरू झालेली ही दिंडी ५ जुलैपर्यंत चालणार आहे. संविधानाचा प्रचार प्रसार योग्यच आहे. परंतु त्या संविधानाच्या अंमलबजावणीचे काय? ज्या विद्यार्थ्यांसाठी बार्टी स्थापन झाली त्याचे काय. जेईई, नीट प्रशिक्षणाला अजुनही सुरूवात झालेली नाही. विदेशी विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीची अजुनही विद्यार्थ्यांना प्रतीक्षाच आहे.

दहावीचा निकाल लागून महिना होत आला आहे. परंतु बार्टीतर्फे देण्यात येणाऱ्या जेईई व नीटच्या मोफत प्रशिक्षणाला अद्याप सुरुवात झालेली नाही. हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाशी संबंधित असल्याने ते वेळेत सुरू होणे अपेक्षित आहे. हजारो मागासवर्गीय विद्यार्थी या प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत असून त्याचा मुहूर्त कधी निघणार असा प्रश्न विचारला जात आहे.

दहावीच्या निकाल लागताच पालक व विद्यार्थी जेईई व नीटच्या तयारीला लागतात. त्यादृष्टीने इतर खासगी संस्थामध्ये प्रशिक्षणाला एप्रिल महिन्यातच सुरुवात झाली आहे. राज्यातील अनुसूचित जातीच्या शेकडो गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ते खासगी प्रशिक्षण घेण्यास असमर्थ आहेत. त्यांच्यासाठी बार्टी मोठा आधार आहे व ते या प्रशिक्षणच्या आतुरतेने प्रतीक्षेत आहेत. प्रशिक्षण घेऊन हे गुणवंत विद्यार्थी देशातील नामांकित आयआयटी, एनआयटी आणि वैद्यकीय महाविद्यालय मध्ये प्रवेश प्राप्त करू शकतात. या वर्षीच्या प्रशिक्षणाला खूप जास्त विलंब होत असल्यामुळे शेकडो अनुसूचित जातीच्या विद्यार्थांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. वर्ग १० वी चा निकाल लागून बरेच दिवस झाल्यामुळे विद्यार्थी व पालकाकडून बार्टीच्या अधिकृत प्रशिक्षण संस्थांमध्ये यावर्षीचे प्रशिक्षणाबाबत सातत्याने विचारणा होत आहे.

फाॅरेन स्काॅलरशीप साठी विद्यार्थी ताटकळतफाॅरेन स्काॅलरशीपसाठी अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विद्यार्थ्यांचे प्रवेश जवळ आले आहेत. परंतु स्काॅलरशीपचीयादी न लागल्याने विद्यार्थी प्रवेशासाठी ताकटळत बसले आहेत. याबाबत विद्यार्थी विचारणा करतात तेव्हा त्यांना विभागाकडून कुठलेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :nagpurनागपूरEducationशिक्षण