नागपुरात  बारमध्ये गुंडांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 11:50 PM2018-09-10T23:50:55+5:302018-09-10T23:51:32+5:30

धरमपेठेतील एका बारमध्ये रविवारी मध्यरात्री गुंडांनी हैदोस घालून तोडफोड केली. गार्डला मारहाण केली तर एका कर्मचाऱ्याच्या डोक्यावर बियरची रिकामी बाटली फोडली. सुमारे १० मिनिट गुंडांचा हैदोस सुरू होता. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.

In the bar of the city, the goons are riot up | नागपुरात  बारमध्ये गुंडांचा हैदोस

नागपुरात  बारमध्ये गुंडांचा हैदोस

Next
ठळक मुद्देबिअरची बाटली डोक्यावर फोडली : एकाला अटक, दुसरा अल्पवयीन ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धरमपेठेतील एका बारमध्ये रविवारी मध्यरात्री गुंडांनी हैदोस घालून तोडफोड केली. गार्डला मारहाण केली तर एका कर्मचाऱ्याच्या डोक्यावर बियरची रिकामी बाटली फोडली. सुमारे १० मिनिट गुंडांचा हैदोस सुरू होता. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.
धरमपेठेतील चारियेट बारमध्ये आरोपी राहुल उमाशंकर गौर (२६, रा. आंबेडकरनगर, धरमपेठ) आणि त्याचा एक अल्पवयीन साथीदार रविवारी रात्री बारमध्ये आले. बराच वेळ दारू पिल्यानंतर मध्यरात्री १२.३० च्या सुमारास त्यांनी बिलावरून वाद सुरू केला. सुरक्षा रक्षक प्रेम यादव मध्ये आला असता त्याला मारहाण केली. तसेच बारमधील कर्मचारी किशन यादव याच्या डोक्यावर बिअरची रिकामी बाटली फोडली. बारच्या मालकाला आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी आरोपींना पकडून त्यांची बेदम धुलाई केली. नंतर सीताबर्डी पोलिसांना कळवून आरोपींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. बारचे व्यवस्थापक अक्षय अजय दुबे (२५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी राहुलला अटक केली. आरोपींनी त्यांना खंडणीचीही मागणी केल्याचे व्यवस्थापक दुबेंनी तक्रारीत नमूद केले आहे.

Web Title: In the bar of the city, the goons are riot up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.