शहरं
Join us  
Trending Stories
1
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
2
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
3
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
4
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
5
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
6
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
7
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
8
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
9
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
10
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
11
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
12
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
13
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
14
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
15
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
16
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
17
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
18
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
19
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
20
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चोरीच्या प्रकरणात बालाघाटचा युवक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:07 IST

नागपूर : पारडी पोलिसांनी ॲक्टिव्हा चोरीच्या प्रकरणात सहभागी बालाघाटच्या युवकाला अटक केली आहे. आरोपी अंकुश सतीश लखेरा (२३, रा. ...

नागपूर : पारडी पोलिसांनी ॲक्टिव्हा चोरीच्या प्रकरणात सहभागी बालाघाटच्या युवकाला अटक केली आहे. आरोपी अंकुश सतीश लखेरा (२३, रा. लखेरा मोहल्ला, बालाघाट, एमपी) हा आहे. दीड महिन्यापूर्वी शिवजयंतीच्या दिवशी भांडेवाडी निवासी धीरज चिंचघरे यांची घरापुढे उभी असलेली ॲक्टिव्हा चोरीला गेली होती. पोलिसांनी १२ एप्रिल रोजी अंकुशला ॲक्टिव्हासह पकडले. विचारपस केल्यावर ॲक्टिव्हा धीरजची असल्याची माहिती मिळाली. अंकुश धंतोली येथील तकीया परिसरात भाड्याच्या घरात राहतो. त्याच्याविरोधात चोरीचे प्रकरण नोंदविण्यात आले आहे. ही कारवाई एपीआय मारुती शेलगे, हवालदार भगन राऊत, शिपाई राजेश नाईक, विजय लांडे व मनोहर रेहपाडे यांनी केली.

-------------

दारूची अवैध विक्री करणाऱ्या तिघांना अटक

नागपूर : यशोधरानगर पोलिसांनी दारूची अवैध विक्री करणाऱ्या महिलेसह तिघांना अटक केली आहे. आरोपी सावित्रीबाई जागोजी पराते (६०, रा. बिनाकी मंगळवारी), कृष्णा कन्हैयालाल निमजे (५२, रा. गुलशननगर) व चंद्रशेखर रामभाऊ चिकाटे (४१, रा. संजय गांधीनगर) हे आहेत. दारूच्या अवैध विक्रेत्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ॲक्टिव्हासह ६२ हजार रुपयाचे साहित्य जप्त करण्यात आले. त्यांच्याविरोधात मद्यविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पीआय अशोक मेश्राम, पीएसआय जितेंद्र भागव, एएसआय विनोद सोलव, अक्षय सोरदे, शिपाई विशाल साखरे व किशोर धोटे यांनी केली.

................