शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
3
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
4
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
5
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
6
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
7
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
8
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
10
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
11
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
12
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
13
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
14
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
15
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
16
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
17
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
18
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
19
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
20
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

मनपा निवडणुकांच्या तोंडावर गटबाजी टाळा

By admin | Updated: October 14, 2016 03:20 IST

पक्षांतर्गत दुफळी ही शहर राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी नवीन बाब नाही. मात्र मनपा निवडणुकांच्या तोंडावर गटबाजी दिसून येऊ नये

राष्ट्रवादीच्या नेत्यांना निर्देश : अंतर्गत वाद चव्हाट्यावर नकोयोगेश पांडे  नागपूरपक्षांतर्गत दुफळी ही शहर राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी नवीन बाब नाही. मात्र मनपा निवडणुकांच्या तोंडावर गटबाजी दिसून येऊ नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश पक्षनेत्यांना प्रदेश पातळीवरून देण्यात आले आहेत. याअगोदर कितीही वाद झाले असले तरी आता निवडणुकांपर्यंत तरी अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर न आणता एकीने काम करण्याच्या सूचना प्रदेश कार्यकारिणीच्या नेत्यांकडून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.पक्षाच्या स्थापनेला १७ वर्षे झाली असली तरी अद्यापही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा नागपूर शहरात हवा तसा प्रभाव दिसून येत नाही. सातत्याने कॉंग्रेससोबत आघाडी केल्यामुळे कार्यकर्त्यांना संधीच मिळाली नाही व त्यामुळे पक्ष वाढला नाही, अशी पक्ष पदाधिकाऱ्यांची भावना आहे. मात्र पक्षात त्याहून मोठी समस्या म्हणजे नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. शहराध्यक्ष अनिल देशमुख व माजी शहराध्यक्ष अजय पाटील यांच्या गटातील वाद अनेकदा समोर आला आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला याचा चांगलाच फटका बसला होता. अगदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरदेखील या गटबाजीचे प्रदर्शन झाले. जर विदर्भात पक्षाचा जम वाढवायचा असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत चांगली कामगिरी व्हायलाच हवी, यादृष्टीने पक्षश्रेष्ठींकडून रणनीती तयार करण्यात येत आहे. मात्र नागपूर महानगरपालिका निवडणुकांत अंतर्गत वादाचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच याबाबत पुढाकार घेतला आहे. स्थानिक पक्ष पदाधिकाऱ्यांची त्यांनी काही दिवसांअगोदर बैठक घेतली. कुठल्याही परिस्थितीत निवडणुकांपर्यंत अंतर्गत वाद बाहेर आणू नका, असे स्पष्ट निर्देशच त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या विभागीय कार्यकर्ता मेळाव्याअगोदरदेखील गटातटाचे राजकारण स्पष्ट दिसून आले होते.भूतकाळ विसरून भविष्यकाळाकडे पाहायासंदर्भात सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारची बैठक झाली असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. निवडणुकांना सामोरे जाण्याअगोदर पक्षात एकी दिसली पाहिजे ही खरी बाब आहे. नागपुरात नेत्यांमध्ये अगोदर काही गैरसमज होते. पण आता ते दूर झाले आहेत. निवडणुका लक्षात घेता सर्वांना वाद विसरून एकदिलाने काम करण्याबाबत सांगण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.