शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

‘अवनी’च्या कुटुंबाचा अखेर झाला अंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:08 IST

नागपूर : दोन वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात पाच व्यक्तींचा बळी घेणाऱ्या टी-१ म्हणजेच ‘अवनी’ या वाघिणीच्या हत्येनंतर तिची दोन पिले ...

नागपूर : दोन वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात पाच व्यक्तींचा बळी घेणाऱ्या टी-१ म्हणजेच ‘अवनी’ या वाघिणीच्या हत्येनंतर तिची दोन पिले अनाथ झाली होती. त्यातील एकाचा पुढे पत्ता लागला नाही, तर दुसरी मादी बछडी दोन वर्षापासून पेंचमध्ये वन विभागाच्या देखरेखीखाली वाढत होती. मात्र आठवडाभरापूर्वी जंगलात सोडल्यावर तिच्यावर दुसऱ्या वाघाकडून हल्ला झाला. त्यात ती जखमी झाली. मात्र उपचारादरम्यान १२ मार्चला रात्री ती दगावली. देशभरात चर्चेत आलेल्या अवनीच्या कुटुंबातील एकमेव ज्ञात वारसदारही आता दगावल्याने तिच्या कुटुंबाचाच शेवट झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

अवनीच्या हत्येनंतर तिची दोन पिले अनाथ झाली होती. जंगलात ती उपासाने दगावतील, अशी भीती वन विभागाला होती. या बछड्यांचा शोध सुरू असताना दोन पिले दिसलीही. मात्र त्यातील एकाचा पुढे पत्ताच लागला नाही. या घटनेनंतर सुमारे वर्षभराने दुसरी मादी बछडी वन विभागाने रेस्क्यू करून पेंचमध्ये आणली. पीटीआरएफ-८४ असे नाव देण्यात आले. २२ डिसेंबर २०१८ पासून तिला तेथील चार हेक्टर क्षेत्रफळाच्या ओपन एन्क्लोजरमध्ये ठेवून शिकार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. शिकारीसाठी ती सक्षम झाल्याचे लक्षात आल्याने जुलै २०१९ मध्ये तिला मूळ अधिवासात सोडण्यावर चर्चा झाली. मात्र एनटीएसीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काही त्रुटी दाखविल्याने हे लांबले. पुढे वर्षभराने या प्रस्तावाला मंजुरी मिळून ७ जुलै २०२० च्या बैठकीत तिला सोडण्यावर एकमत झाले. नंतरच्या घडामोडीत एनटीसीएकडून परवानगी आली. त्यामुळे गेल्या आठवड्यात ५ मार्चला तिला निसर्गात सोडण्यात आले होते. मात्र ८ मार्चला जंगलातील अन्य वाघिणीशी तिची झुंज झाली होती. त्यात गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. ठणठणीत झाल्यावर तिला पुन्हा निसर्गात सोडले जाणार होते. मात्र नियतीने ही संधीच दिली नाही. शनिवारी १३ मार्चला रात्री ११ वाजता ती दगावली. यासोबतच तिच्या कुटुंबाचाही अंत झाला.

...

‘अवनी’ गाजली देशभरात !

२०१६ पासून अवनीची यवतमाळच्या जंगलात दहशत होती. २०१८ च्या काळात ७ जणांचा या वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे या वाघिणीला नरभक्ष्यी ठरविण्यात आले होते. तिला ठार करण्याच्या मागणीसाठी वन विभागावर आणि प्रशासनावर प्रचंड दबाव वाढत होता. अखेर शुक्रवारी ३ नोव्हेंबर २०१८ रोजी रात्री उशिरा राळेगाव तालुक्यातील बोराटी गावाजवळच्या जंगलात तिला शार्प शूटरकडून ठार करण्यात आले.

या वाघिणीला ठार केल्यानंतर एकीकडे स्थानिकांमध्ये आनंद, तर दुसरीकडे वन्यजीवप्रेमींमध्ये संताप, असे चित्र निर्माण झाले होते. प्रशासनाने तिला पकडण्याचा प्रयत्नच केला नाही, थेट ठारच करण्यात आल्याचा आरोप आजही होत आहे. तर, ‘अवनी’ला गोळी मारण्यापूर्वी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला, असा वन विभागाचा दावा आहे. टीममधील सदस्य शेख यांनी वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला. तो डार्ट वाघिणीला लागला, पण मागे जात तिने पुन्हा हल्ला केला. हे कर्मचारी जिप्सीमध्ये होते. शेवटी स्वरक्षणासाठी शार्प शूटरने आठ ते दहा मीटर अंतरावरून गोळी झाडली. त्यात ही वाघीण जागेवरच मेली, असे वन विभागाचे म्हणणे आहे. मृत्यूनंतरही तिची कहाणी संपलेली नाही. हे प्रकरण न्यायालयात गेले आहे.

...