शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना हवे हॉटेलच!

By admin | Updated: December 4, 2015 02:56 IST

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात येणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांची बडदास्त ठेवण्यासाठी नागपुरातील शासकीय कार्यालयातील यंत्रणा कामाला लागली आहे.

कर्मचाऱ्यांकडून कलेक्शन सुरू : स्थानिक अधिकारी लागले कामालागणेश हूड  नागपूरविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात येणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांची बडदास्त ठेवण्यासाठी नागपुरातील शासकीय कार्यालयातील यंत्रणा कामाला लागली आहे. सनदींची शाही व्यवस्था व्हावी यासाठी उपराजधानीतील अलिशान हॉटेलात बुकिंग सुरू आहे. अधिक ारी नाराज होऊ नयेत यासाठी चोख व्यवस्था करण्याच्या सूचना विभाग प्रमुखांनी अधिनस्त अधिकाऱ्यांना केल्या आहेत. यामुळे वर्षभरातच शासकीय कार्यालयात निधी संकलनाची जुनी परंपरा पुन्हा सुरू झाल्याची चर्चा आहे. वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पराभव झाला. राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली. युती सरकारला लगेच विधिमंडळाच्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला सामोरे जावे लागले होते. युती सरकारने अधिवेशनासाठी मुंबईहून नागपुरात येणारे मंत्री व सनदी अधिकाऱ्यांनी अलिशान हॉटेलात वास्तव्य न करता शासकीय निवासस्थानी निवास करण्याची नवीन परंपरा सुरू केली होती. त्यामुळे काही मंत्री व अधिकाऱ्यांची इच्छा नसतानाही त्यांना रविभवन, नागभवन व विभागाच्या शासकीय विश्रामगृहात मुक्काम करावा लागला होता. यात गैरसोय झाल्याची अनेकांची तक्रार होती. परंतु या निर्णयामुळे नागपुरातील शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला होता. गेल्या वर्षाचा अनुभव लक्षात घेता यावेळी अलिशान हॉटेलात व्यवस्था करण्याच्या सूचना वरिष्ठाकडून नागपुरातील अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे उपराजधानीतील शासकीय अधिकारी आपल्या वरिष्ठांची शाही व्यवस्था करण्याच्या कामाला लागले आहे. वर्षभरात युती सरकारला जुनीच व्यवस्था योग्य असल्याचा प्रत्यय आल्याची शासकीय कार्यालयात चर्चा आहे. अधिवेशन कालावधीत अधिकारी व कर्मचारी बड्या अधिकाऱ्यांची बडदास्त ठेवण्यात व्यस्त असतात. विधिमंडळात उपस्थित करण्यात आलेले प्रश्न व लक्षवेधीची उत्तरे शोधण्याचे काम वगळता शासकीय कार्यालयात कामकाज ठप्पच असते. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे होत नाहीत. त्यातच विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिका व जिल्हा परिषदेतील कामकाज ठप्प असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)४६ कॉटेज व ८० सूटरविभवन व नागभवन येथे ४६ कॉटेज व ८० सूट आहेत. रविभवन येथे कॅबिनेट मंत्री तर नागभवन येथील कॉटेज येथे राज्यमंत्र्यांच्या निवासाची व्यवस्था केली जाते. येथील उपलब्ध सूट व विविध विभागाच्या विश्रामगृहात अधिकाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था असते. परंतु येथील व्यवस्थेवर काही मंत्री व अधिकारी नाराज असल्याचे समजते.