शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल चाेरटा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : घरफाेडी करणारा तसेच पर्यटकांना लुटणाऱ्या अट्टल चाेरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कवलेवाडा (जिल्हा भंडारा) ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : घरफाेडी करणारा तसेच पर्यटकांना लुटणाऱ्या अट्टल चाेरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कवलेवाडा (जिल्हा भंडारा) येथून अटक केली. त्याच्याकडून २२ हजार रुपयाचे साहित्य जप्त केले, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कारवाई शनिवारी (दि. १३) करण्यात आली.

कामेश ऊर्फ सन्नाटा ऊर्फ मन्या सरेंद्रजन बंधू (२८, रा. कवलेवाडा टाेला, जिल्हा भंडारा) असे अटक करण्यात आलेल्या चाेरट्याचे नाव आहे. काही दिवसापूर्वी रामटेक शहरातील सेलिब्रेशन हाॅलच्या गाेदामातून साऊंड सिस्टीमचे एम्प्लीफायर मशीन चाेरीला गेल्याची तसेच गडमंदिर परिसरात फिरायला आलेल्या जाेडप्याला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दाेन माेबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली हाेती. या प्रकरणांमध्ये रामटेक पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला. शिवाय, स्थानिक गुन्हे शाखेनेही या घटनांचा समांतर तपास सुरू केला.

ही चाेरी कामेशने केल्याचे तसेच ताे कवलेवाडा येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली हाेती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कवलेवाडा गाठून त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली. शिवाय, त्याने या चाेऱ्या केल्याचे तसेच एम्प्लीफायर मशीन तीन हजार रुपयात नीलेश मनाेहर परसमाेड, रा. मनसर याला विकल्याचे पाेलिसांना सांगितले. पाेलिसांनी ती मशीन जप्त केली असून, ती २२ हजार रुपयाची असल्याचे सांगितले.

त्याच्याकडून चाेरीच्या इतर घटना उघड हाेण्याची शक्यता स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी भादंवि ४६१, ३८०, ३९४ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते, हवालदार ज्ञानेश्वर राऊत, दिनेश आधापुरे, शैलेश यादव, अमाेल वाघ, विपीन गायधने, नम्रता बघेल यांच्या पथकाने केली.