शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी भिडे यांच्या शास्त्रीय गायनाची रंगत

By admin | Updated: September 17, 2014 00:55 IST

सकाळची आल्हाददायक वेळ...वातावरणात भारलेला जरासा गारवा...शास्त्रीय सुरावटींची प्रसन्न अनुभूती...आणि भरगच्च रसिकांची उपस्थिती. प्रात:कालीन मैफिल ऐकण्याचा फारसा प्रचलित नसलेला

ब्रह्मनाद प्रात:कालीन मैफिल : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केद्रांचा उपक्रम नागपूर : सकाळची आल्हाददायक वेळ...वातावरणात भारलेला जरासा गारवा...शास्त्रीय सुरावटींची प्रसन्न अनुभूती...आणि भरगच्च रसिकांची उपस्थिती. प्रात:कालीन मैफिल ऐकण्याचा फारसा प्रचलित नसलेला पण हल्लीच्या धावपळीत प्रात:कालीन राग त्याच वेळी ऐकण्यासाठी उत्सुक असणारे श्रोते दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात एकत्रित आले होते. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांनी षडज् लावला आणि टाळ्यांच्या प्रतिसादात रसिकांनी त्यांचे स्वागत केले. ललित, विभावरी रागांची ही मैफिल त्यानंतर रसिकांच्या हृदयात घर करणारी ठरली. जयपूर - अत्रोली घराण्याच्या शास्त्रीय गायिका डॉ. अश्विनी भिडे - देशपांडे यांच्या गायनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या शृंखलाबद्ध ह्यब्रह्मनादह्ण उपक्रमात त्यांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला एनएडीटीच्या महासंचालक किरण ओबेरॉय वासुदेव, डॉ. अग्निहोत्री, केंद्राचे संचालक डॉ. पीयूष कुमार, कार्यक्रम अधिकारी दीपक कुळकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. विभागीय आयुक्त अनुप कुमार आणि त्यांच्या पत्नी लीना श्रीवास्तव यांनीही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली. कार्यक्रमाचा प्रारंभ डॉ. अश्विनी भिडे - देशपांडे यांनी राग ललितने केला. राग ललितमध्ये छोटा ख्याल आणि द्रुत लयीत मोठा ख्याल सादर करून त्यांनी रसिकांची दाद घेतली. त्यानंतर त्यांनी विभावरी रागाची ठेवण मांडताना त्यात या रागाला पूरक तीन रागांची संमिश्र मांडणी त्यांनी तयारीने सादर केली. गायनाचा समारोप भैरवी मधील भजनाने त्यांनी केला. सकाळच्या प्रहरी डॉ. भिडे यांचे सुमधूर स्वर वातावरणाला अधिक प्रसन्न करणारे होते. त्यांना तबल्यावर संदेश पोपटकर यांनी तर संवादिनीवर संदीप गुरमुळे यांनी साथसंगत केली. तानपुऱ्यावर कल्पना खर्डेनवीस होत्या. या कार्यक्रमातून प्राप्त झालेला निधी काश्मीरातील पूरग्रस्तांच्या सहायतेसाठी पाठवला जाणार असल्याचे केंद्र संचालक डॉ. पीयूष कुमार यांनी यावेळी सांगितले. भारतीय डाक विभागाद्वारे प्रकाशित भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांवर काढण्यात आलेल्या डाक तिकिटांचे प्रदर्शन याप्रसंगी केंद्र परिसरात लावण्यात आले होते. या प्रदर्शनालाही श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. आॅक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी, १२ आॅक्टोबर रोजी ह्यब्रह्मनादह्ण मध्ये सुफी कव्वाली गायक निजामी बंधू यांना आमंत्रित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)