शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
2
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
3
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
4
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
5
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
6
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
7
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
8
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
9
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
10
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
11
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
12
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
13
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
14
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
15
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
16
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
17
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
18
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
19
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील नवोदितांचे कला सादरीकरण

By admin | Updated: May 25, 2014 00:54 IST

विदर्भातील प्रतिभावंत कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देणार्‍या आणि कला सादरीकरणाला प्रतिष्ठित व्यासपीठ प्रदान करणार्‍या ‘विदर्भाज गॉट टॅलेण्ट’ या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन आज

विदर्भाज गॉट टॅलेण्ट स्पर्धेचा शुभारंभ : चिटणवीस सेंटर

नागपूर : विदर्भातील प्रतिभावंत कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देणार्‍या आणि कला सादरीकरणाला प्रतिष्ठित व्यासपीठ प्रदान करणार्‍या ‘विदर्भाज गॉट टॅलेण्ट’ या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन आज चिटणवीस सेंटर येथे करण्यात आले. सेहोर्स इन्फोबॉजीक्स अँड एन्टरटेन्मेन्ट प्रा. लि. कंपनीतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गायन, नृत्य, अभिनय असा वैविध्यपूर्ण कला सादरीकरणाच्या या कार्यक्रमात १२0 बाल युवा स्पर्धकांचा यात सहभाग होता.

विदर्भातील कलावारांना राष्ट्रीय पातळीवर कला सादरीकरणाची संधी मिळावी तसेच भावी सिने जगताचा प्रवेश खुला करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. क्रमश: या स्पर्धेचे आयोजन संपूर्ण विदर्भात करण्यात येणर असल्याचे यावेळी आयोजकांनी जाहीर केले. आज सार्वत्रिक लोकप्रियता मिळविणार्‍या टेलिव्हीजनच्या रिअँलिटी शो प्रमाणेच हे आयोजन करण्यात आले. रंगीबेरंगी नृत्य वेशातील सहभागी हौशी व गुणी कलावंतांचे हे सादरीकरण म्हणजे जणू तारे जमी पर चाच अनुभव होता. आयोजकांतर्फे प्रत्येक भाषेत चार याप्रमाणे हिंदी, मराठी आणि दोन भोजपुरी चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजयी होणार्‍या कलावंतांना या चित्रपटात संधी देण्यात येणार आहे. आयोतकांतर्फे कंपनीचे सीएमडी मनिषसिंग चौहान याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण प्रियंका सिंग, श्रृती जैन, अमोल मोनेकर यांनी केले. यावेळी मोठय़ा संख्येने रसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)