शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे आगमन, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST

नागपूर : मागील चार दिवसांपासून खोळंबलेल्या पावसाचे पुन्हा नागपूरसह विदर्भात आगमन झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मागील ...

नागपूर : मागील चार दिवसांपासून खोळंबलेल्या पावसाचे पुन्हा नागपूरसह विदर्भात आगमन झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मागील २४ तासात विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने दिलासा दिला आहे. हवामान विभागाने नागपूरसह विदर्भातील वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. या सोबतच अन्य जिल्ह्यातही तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

नागपुरात २४ तासात झालेल्या पावसामुळे तापमानही बरेच घटले आहे. बुधवारी ५.१ अंश सेल्सिअसने तापमानात घट होऊन ते ३१.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारी पाऊस आल्याने पारा खालावला आहे. सकाळची आर्द्रता ९८ टक्के तर सायंकाळी ती ८८ टक्के नोंदविली गेली.

नागपूर शहरासह ग्रामीण भागातही दुपारी आणि रात्रीच्या पावसाची नोंद झाली. यामुळे शेतकरी पुन्हा खोळंबलेल्या पेरणीच्या कामी लागला आहे. विदर्भात मागील २४ तासात अमरावतीमध्ये ८.८ मिमी पाऊस पडला. चंद्रपूर ८.२, गडचिरोली ३.४, गोंदिया ७.२, नागपूर ६.४, वर्धा २.८ आणि वर्धा येथे २.८ तर यवतमाळात २ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली.

...

विदर्भातील तापमान

जिल्हा : कमाल : किमान

अकोला : ३१.९ : २५.१

अमरावती : २९.० : २३.१

बुलडाणा : २९.० : २४.०

चंद्रपूर : ३१.२ : २३.२

गडचिरोली : २८.४ : २३.४

गोंदिया : २९.० : २३.०

नागपूर : ३१.१ : २४.२

वर्धा : २८.८ : २५.०

वाशिम : २९.० : २१.०

यवतमाळ : २५.५ : २३.५

...