सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात प्रवेशासाठी ३१ मेपर्यंत करा अर्ज

By आनंद डेकाटे | Published: May 6, 2024 06:26 PM2024-05-06T18:26:23+5:302024-05-06T18:30:21+5:30

Nagpur : लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन

Apply till 31st May for admission in Army Hostels | सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात प्रवेशासाठी ३१ मेपर्यंत करा अर्ज

Apply till 31st May for admission in Army Hostels

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
नागपूर येथील शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या आजी सैनिक, माजी सैनिक पाल्यांना सवलतीच्या दरात व माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना मोफत निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध आहे. ३१ मेपर्यंत प्रवेशासाठी अर्ज भरता येणार आहे.

माजी सैनिकी मुलांची वसतीगृह क्षमता ६० व माजी सैनिकी मुलींची वसतीगृह क्षमता ७० आहे. ज्या आजी सैनिक, माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना या वसतिगृहात प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी माजी सैनिकी मुलांचे-मुलींचे वसतीगृह, हिस्लॉप कॉलेज जवळ, सिव्हील लाईन्स, नागपूर येथून ५० रूपयाचा प्रवेश अर्जाचा फॉर्म व माहिती पुस्तिका घेऊन ३१ मे पर्यंत माजी सैनिक ओळखपत्र, गुणपत्रिका व शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेल्या संस्थेच्या दाखल्याच्या छायांकित प्रतिसह माजी सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात जमा करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॅा. शिल्पा खरपकर यांनी केले आहे.

Web Title: Apply till 31st May for admission in Army Hostels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.