शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सातवा वेतन आयोग त्वरित लागू करा

By admin | Updated: August 18, 2016 02:15 IST

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी, भत्ते, सेवा सवलती देण्यात याव्यात,

एसटी कर्मचाऱ्यांची मागणी : महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेसचे आंदोलन नागपूर : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी, भत्ते, सेवा सवलती देण्यात याव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेसच्यावतीने विभाग नियंत्रक कार्यालय आणि हिंगणा येथील मध्यवर्ती कार्यशाळेसमोर निदर्शने करण्यात आली. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेसचे आमदार जयप्रकाश छाजेड यांनी राज्यव्यापी संपर्क यात्रा काढून कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी १७ आणि १८ डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच आश्वासन दिले होते. परंतु या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे पुन्हा संपावर जाण्याआधी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने हे धरणे आंदोलन आयोजित केले. आंदोलनात १ एप्रिल २०१६ पासून एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा, चालक वाहकांच्या ड्युटी अलोकेशन संगणकीकृत करून टी ९ रोटेशनची अंमलबजावणी करावी, यांत्रिक कर्मचाऱ्यांना ग्रेडेशनचा लाभ द्यावा, कॅशलेस मेडिकल योजना लागू करावी, विनंती बदल्या त्वरित कराव्या, महिला कर्मचाऱ्यांना सोयी-सवलती, ठरलेल्या वेळेत काम द्यावे, कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी दोन वर्षे करावा, कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्यास प्रवाशांप्रमाणे १० लाख रुपये आणि पाल्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी, लांब पल्ल्याची बंद करण्यात आलेली नियते सुरू करावी आदी मागण्या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. विभाग नियंत्रक कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात संघटनेचे नेते लक्ष्मण घुमरे, प्रादेशिक सचिव शैलेश भारती, महासचिव अरुण भागवत, अध्यक्ष नंदू वैष्णव, कार्याध्यक्ष विजय शेंडे उपस्थित होते तर हिंगणा येथील मध्यवर्ती कार्यशाळेत झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व महासचिव सुभाष गोजे, मोरेश्वर कुमेरिया, वसंत वैद्य यांनी केले. (प्रतिनिधी)