शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन : आॅरेंज अ‍ॅण्ड कॉटन बिल्डकॉनचा आठवा वर्धापनदिन

By admin | Updated: July 9, 2015 03:07 IST

नागपूर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडून नागपूरकरांना प्रचंड अपेक्षा आहेत. शहराचे योग्य नियोजन करून ...

लोकांना स्वस्तात घरे उपलब्ध करून द्यावीतनागपूर : नागपूर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडून नागपूरकरांना प्रचंड अपेक्षा आहेत. शहराचे योग्य नियोजन करून तसेच बांधकाम व्यावसायिकांना शासकीय पातळीवर होणारा नाहक त्रास दूर करून येथील नागरिकांना स्वस्त घरे उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी येथे केले. आॅरेंज अ‍ॅड कॉटन बिल्डकॉन प्रा.लि.चा आठवा वर्धापनदिन मंगळवारी रात्री उत्साहात पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून विजय दर्डा बोलत होते. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात चित्रकार प्रमोद रामटेके, ‘वेद’ चे सचिव राहुल उपगन्लावार, बिल्डर राजू कुणावार, शिरीष रामापुरे, आॅरेंज अ‍ॅड कॉटन बिल्डकॉन प्रा.लि.चे संचालक सुदत्ता रामटेके आणि भूपेश वाघमारे उपस्थित होते.विजय दर्डा म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळात नितीन गडकरी यांच्याकडे महत्त्वाचे खाते आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. हे दोन्ही लोकप्रतिनिधी विदर्भाचे सुपुत्र आहेत. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. या शहराचे मॅपिंग झाले पाहिजे. लोकांना स्वस्त घरे कशी मिळतील, त्याचा विचार केला पाहिजे. आज नागपूर सुधार प्रन्यासला भरमसाठ फी द्यावी लागते. बिल्डिंगचा नकाशा मंजूर करण्यासाठी २४ टेबलावरून जावे लागते. भ्रष्टाचार बोकाळला असून एका बिल्डिंगचा नकाशा आणि इतर परवानग्यांसाठी २५ लाख रुपयांची लाच द्यावी लागते. मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचे निर्मुलन आणि लोकांना स्वस्ते घरे उपलब्ध करून दिली पाहिजे, असे दर्डा म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या धर्तीवर शहराचा प्लॅन तयार करून व्हर्टिकल विकास आणि वाढीव एफएसआय द्यावा, अशी मागणी दर्डा यांनी यावेळी केली. मेट्रो रिजनमध्ये विकासासाठी जास्त पैसा लागतो, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, असेही आवाहन खा. दर्डा यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)