शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

आंबिया संत्र्याला गळती

By admin | Updated: September 19, 2014 00:54 IST

नापिकी, अवर्षण, कर्जबाजारीपणा व नैसर्गिक संकटाने शेतकरी हताश झाला आहे. त्यातच आता आंबिया बहारातील संत्र्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मागील महिन्यात झालेल्या

संत्रा धोक्यात : हेक्टरी ५० हजार रुपयांच्या अनुदानाची मागणीआनंदराव गुरमुळे - नरखेडनापिकी, अवर्षण, कर्जबाजारीपणा व नैसर्गिक संकटाने शेतकरी हताश झाला आहे. त्यातच आता आंबिया बहारातील संत्र्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मागील महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे संत्रा मोठ्या प्रमाणात खाली येत असल्याचे तालुक्यात चित्र आहे. त्यामुळे संत्रा बागयतदार धास्तावले आहेत.नरखेड, काटोल, कळमेश्वर या तालुक्यात संत्र्याच्या मोठ्या प्रमाणात बागा आहेत. संत्र्याच्या झाडांवर देठ सुकीचा प्रादुर्भाव झाल्याचे बागायतदारांनी सांगितले. नरखेड तालुक्यात संत्रा, मोसंबीचे लागवड क्षेत्र ८१८२ हेक्टर, काटोलमध्ये ७०९५ हेक्टर व कळमेश्वरमध्ये ४०५६ हेक्टर आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबिया संत्र्यास मोठ्या प्रमाणात फटका बसला. यंदा लांबवणीवर पाऊस पडल्याने वातावरणात लक्षणीय बदल झाला आहे. संत्र्याच्या झाडातील सूक्ष्मद्रव्याचे संतुलन बिघडल्याची स्थिती आहे. देठ सुकीच्या रोगामुळे संत्रा झाडे ग्रासल्यामुळे फळे पिवळी होऊन गळत आहेत. जमिनीतील उष्णतेमुळे ही गळ होत असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.