नक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ

By Admin | Updated: May 13, 2014 00:22 IST2014-05-13T00:22:22+5:302014-05-13T00:22:22+5:30

नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांवर वैफल्यातून हल्ला केला. या घटनेमुळे पोलिसांचे मनोबल घसरणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ आणि नक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ,

Answer the naxals | नक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ

नक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ

ंवैफल्यातून हल्ला : गृहमंत्री आर. आर. पाटील यांची प्रतिक्रिया

ंनागपूर : नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांवर वैफल्यातून हल्ला केला. या घटनेमुळे पोलिसांचे मनोबल घसरणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ आणि नक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. मुरमुरी (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडवून नक्षल्यांनी रविवारी सकाळी पोलिसांचे वाहन उडवून दिले. या स्फोटात सात पोलीस शहीद झाले. तर हेमंत बनसोडे (३0) आणि पंकज सिडाम (२९) हे दोघे जबर जखमी आहेत. स्थानिक ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये ते भरती आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी गृहमंत्री आज रात्री ७.४५ वाजता इस्पितळात पोहोचले.

जखमी जवानांना बघितल्यानंतर डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. गृहमंत्र्यांनी मात्र कोणत्याच प्रश्नाचे थेट उत्तर दिले नाही. राज्य पोलीस दलाला हादरा देणार्‍या या घटनेमागे कोण आहे, असा प्रश्न केला असता चौकशी सुरू आहे, शोध घेतला जात असल्याचे ते म्हणाले. दिल्लीतील प्रो. साईबाबा यांच्या अटकेचा आणि या घटनेचा काय संबंध आहे, या प्रश्नावर त्यांनी आता काही बोलणे योग्य होणार नाही’, असे उत्तर दिले.

गावाजवळच हा हल्ला झाला, हा पोलिसांचा हलगर्जीपणा नाही काय, असे विचारले असता त्यांनी ठाम इन्कार केला. तीन ते चार दिवस सतत ३0 ते ४0 किलोमीटर जंगलात फिरल्यानंतर थकवा येणे स्वाभाविक आहे. त्यांना घेण्यासाठी जेथे वाहने ठेवलीती सुरक्षित अंतरावरच होती; तरीसुद्धा नक्षल्यांनी डाव साधला.

पोलिसांकडून वारंवार शह मिळत असल्याने आलेल्या वैफल्यग्रस्ततेतूनच त्यांनी हा भ्याडहल्ला केल्याचे गृहमंत्री म्हणाले. या घटनेमुळे पोलिसांचे मनोबल घसरणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहो.

नक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ, असेही गृहमंत्री पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Answer the naxals