अंनिसचा ज्योतिष अभ्यासक्रमाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:06 IST2021-07-04T04:06:37+5:302021-07-04T04:06:37+5:30

नागपूर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिष अभ्यासक्रमाला विरोध दर्शवणारे निवेदन निवासी जिल्हाधिकारी अविनाश कातडे यांना दिले आहे. ...

Annis opposes astrology course | अंनिसचा ज्योतिष अभ्यासक्रमाला विरोध

अंनिसचा ज्योतिष अभ्यासक्रमाला विरोध

नागपूर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिष अभ्यासक्रमाला विरोध दर्शवणारे निवेदन निवासी जिल्हाधिकारी अविनाश कातडे यांना दिले आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने ज्योतिष विषयक अभ्यासक्रम सुरू केला असून, ज्योतिषाचा खगोलशास्त्राशी कवडीचाही संबंध नाही आणि भारतीय संविधानानेही अशा अवैज्ञानिक गोष्टींना मान्यता दिलेली नसल्याची भावना समितीचे राष्ट्रीय महासचिव हरिश देशमुख व नागपूर महानगर अध्यक्ष नीलेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. अशा अभ्यासक्रमाला परवानगी देऊन पुरोगामी महाराष्ट्र व संतांचा अपमान झालेला आहे. या आशयाचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठविण्यात आले. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, नागपूर महानगर सचिव नरेश निमजे, संघटक एम. व्ही. पारधे, महिला संघटक छाया सावरकर उपस्थित होते.

..........

Web Title: Annis opposes astrology course