शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

प्राणी, पक्षी विमानतळापासून दूर

By admin | Updated: August 26, 2016 02:57 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्राणी आणि पक्ष्यांना दूर ठेवणारी विशेष यंत्रणा लवकरच बसविण्यात येणार आहे.

विशेष यंत्रणेची उभारणी होणार : देशातील १० धावपट्ट्यांवर यंत्रणानागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्राणी आणि पक्ष्यांना दूर ठेवणारी विशेष यंत्रणा लवकरच बसविण्यात येणार आहे. त्यामुळे आता धावपट्टीवर प्राणी आणि पक्ष्यांचा वावर दिसणार नाही. ‘बायो इकॉस्टिक बर्ड अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल डिटरेंट सिस्टम’ असे विशेष यंत्रणेचे नाव आहे. ही यंत्रणा विमानतळावर प्राणी येण्याच्या मार्गावर बसविण्यात येणार आहे. देशातील १० विमानतळावर ही यंत्रणा लावण्यात आली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम पाहूनच मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) यंत्रणेला नागपूर विमानतळावर बसविण्याचा निर्णय घेतला. विमानाचे ‘लँडिंग आणि टेकआॅफ’वेळी या उपकरणातून निघणाऱ्या आवाजाने प्राणी आणि पक्षी भयभीत होऊन विमानतळाच्या जवळपास फिरकणार नाहीत. गेल्यावर्षी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे विमान उतरत असताना डुकरे धावपट्टीवर आली होती, हे उल्लेखनीय. या घटनेची तक्रार वैमानिकांनी वायुसेना आणि एटीसीकडे केली होती. वायुसेनेच्या भिंतीच्या फटीतून प्राणी धावपट्टीवर येत असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. वायुसेनेची जमीन मिहानला हस्तांतरित करताना सुरक्षा भिंतीकडे लक्ष दिले नाही. (प्रतिनिधी)डीजीसीएच्या अधिकाऱ्यांतर्फे पाहणीराष्ट्रपतींच्या विमानासमोर डुकरे आल्याच्या घटनेनंतर डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी नागपूर विमानतळाची पाहणी करून व्यवस्थापनाला आवश्यक निर्देश दिले होते. यापूर्वी लोकमतने विशेष वृत्ताद्वारे विमानतळाची तुटलेली सुरक्षा भिंत आणि आवश्यक पैलूवर प्रकाश टाकला होता. त्यानंतर सुरक्षेशी संबंधित कामे तातडीने पूर्ण करण्यात आली. गेल्या सहा महिन्यात विमानतळावर प्राणी वा पक्षी दिसून आलेले नाहीत. विमानतळाच्या कार्यान्वित परिसरात गवत नियमितपणे कापले जात आहे. नवीन यंत्रणा प्रभावीविमानतळावर बसविण्यात येणारी विशेष यंत्रणा प्रभावी आहे. त्यातून निघणाऱ्या आवाजामुळे प्राणी आणि पक्षी दूर राहतील. यंत्रणा बसविण्यासाठी २५ लाख रुपये खर्च होणार आहे. धावपट्टीच्या बाजूला सोलर फेन्सिंग सुरक्षेचे काम करेल.-लक्ष्मीनारायण, वरिष्ठ व्यवस्थापक,विमानतळ सुरक्षा विभाग.