अनिल देशमुख म्हणतात, राष्ट्रवादीत कुठलीही गडबड नाही
By कमलेश वानखेडे | Updated: April 18, 2023 17:57 IST2023-04-18T17:56:51+5:302023-04-18T17:57:21+5:30
Nagpur News राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही गडबड नाही, सर्वकाही ठीक आहे, अजित पवार यांच्याबाबतच्या सर्व चर्चा हा वावड्या आहेत, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी केला.

अनिल देशमुख म्हणतात, राष्ट्रवादीत कुठलीही गडबड नाही
कमलेश वानखेडे
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही गडबड नाही, सर्वकाही ठीक आहे, अजित पवार यांच्याबाबतच्या सर्व चर्चा हा वावड्या आहेत, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी केला.
देशमुख म्हणाले, नागपूरच्या सभेत अजित पवार का बोलले नाही, याचे कारण त्यांनी सभेआधीच सांगितले होते. त्या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व मी बोलणार, असे ठरले होते. अधिवेशनात पवार यांनी विरोधी पक्षनेता म्हणून आपली भूमिका प्रभावीपणे मांडली. सरकारवर सडकून टीका केली. त्यामुळे कुठल्याही चर्चेत काही अर्थ नाही.
संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या दाव्याबाबत विचारणा केली असता देशमुख म्हणाले, राऊत यांनी संपादकीय मध्ये काय लिहिले हे माहीत नाही. राऊत हे दोन दिवसांपूर्वीच आपल्या घरी आले होते. त्यावेळी त्यांनी अशी कुठलीही माहिती त्यांनी दिली. शरद पवार हे २३ एप्रिल रोजी काही कार्यक्रमानिमित्त विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. त्या दौऱ्यात आपणही सहभागी होऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.