शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित आहे अमरनाथ यात्रा

By admin | Updated: July 14, 2015 03:19 IST

यावर्षी होत असलेल्या अमरनाथ यात्रेवर कुठल्याही प्रकारचा धोका नसून संपूर्ण यात्रा ही सुरक्षित आहे, असा दावा केंद्रीय

नागपूर : यावर्षी होत असलेल्या अमरनाथ यात्रेवर कुठल्याही प्रकारचा धोका नसून संपूर्ण यात्रा ही सुरक्षित आहे, असा दावा केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स(सीआरपीएफ)चे महानिरीक्षक पंकज कुमार यांनी केला आहे. पंकज कुमार हे सोमवारी सकाळी सीआरपीएफच्या नागपूर केंद्राची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी चर्चा करीत होते. पंकज कुमार हे सीआरपीएफच्या जम्मू-काश्मीर विभागाचे महानिरीक्षक आहेत. सीआरपीएफच्या सुरक्षेतच अमरनाथ यात्रा सुरू आहे. यासंबंधात बोलताना पंकज कुमार यांनी सांगितले की, अमरनाथ यात्रेवर दीड लाख भक्त आले आहेत. पावसामुळे यात्रेला मध्ये मध्ये थांबविले जाते. भक्तांच्या सुरक्षेत कुठलीही चूक होऊ दिली जात नाही. यात्रेदरम्यान सीमेपलीकडूनही युद्धविरामाचे उल्लंघन झालेले नाही. पंकज कुमार यांनी जम्मू-काश्मीरच्या दहशतवादावर चर्चा करताना सांगितले की, पूर्वीच्या तुलनेत परिस्थिती खूप बदललेली आहे. घुसखोरी मोठ्या प्रमाणावर थांबवण्यात आली आहे. शांततेचे वातावरण निर्माण होत आहे. लोक आता हिंसेवर विश्वास ठेवत नाही. येथील दहशतवाद एक दिवस निश्चित संपेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नक्षलप्रभावित छत्तीसगड, गडचिरोली आणि देशातील इतर भागांमध्ये सीआरपीएफ तैनात करण्याची मागणी वाढत असल्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, दिवसेंदिवस सीआरपीएफची भूमिका वाढत आहे. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सीआरपीएफ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याप्रसंगी उपमहानिरीक्षक संजय यादव यांनी सांगितले की, सीआरपीएफच्या सर्व जवानांना घर उपलब्ध करून देण्याचे आमचे लक्ष्य आहे. आतापर्यंत १३ टक्के लोकांनाच घर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते २५ टक्क्यापर्यंत न्यायचे आहे. सीआरपीएफच्या देशभरातील ४२ केंद्रांमधून तीन सर्वश्रेष्ठ केंद्रांमध्ये सीआरपीएफ नागपूर केंद्राची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर केंद्राची पाहणी करण्यासाठी महानिरीक्षक पंकज कुमार, उपमहानिरीक्षक जे.एस. संधू व संजय यादव नागपूरला आले होते. त्यांनी उपमहानिरीक्षक ए.के. सिंह आणि समादेशक मनोज ध्यानी यांच्यासोबत केंद्राची पाहणी केली. (प्रतिनिधी)