शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

मतदार पावतीचे वाटप आजपासून

By admin | Updated: October 3, 2014 02:50 IST

१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदार पावती (व्होटर्स स्लीप) वाटपाचे काम शुक्रवारपासून सुरू होणार आहे.

नागपूर : १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदार पावती (व्होटर्स स्लीप) वाटपाचे काम शुक्रवारपासून सुरू होणार आहे. निवासी संकुल किंवा तत्सम इमारतींमध्ये या कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी केले.मतदार यादीतील मतदारांचे नाव, त्यांचा क्रमांक, मतदान केंद्र आदींची माहिती असणारी व्होटर्स स्लीप पूर्वी राजकीय पक्षांकडून वाटप केली जात होती. प्रचाराचा एक भाग म्हणून या कामाकडे पाहिले जात होते. त्यावर राजकीय पक्षाचे बोधचिन्ह आणि उमेदवाराचे छायाचित्र राहत असल्याने निवडणूक आयोगाने त्यावर बंदी घातली आणि लोकसभा निवडणुकीपासून निवडणूक यंत्रणेकडेच हे काम सोपविले. एका साध्या कागदावर मतदाराचे नाव आणि मतदान केंद्राचे स्थळ असणाऱ्या व्होटर स्लीप वाटपाचे काम शुक्रवारी ३ आॅक्टोबरपासून सुरू होणार असून ते १० आॅक्टोबरपर्यंत चालेल. या काळात मतदान अधिकारी जिल्ह्यातील १२ ही मतदारसंघात घरोघरी फिरून व्होटर स्लीपचे वाटप करतील. नागरिकांनी या कामाला सहकार्य करावे. शहरात अनेक निवासी संकुले(अपार्टमेंटस्)आहेत. तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मतदान अधिकाऱ्यांना संकुलात प्रवेश करू द्यावा किंवा बाहेर व्होटर्स स्लीप वाटप करण्याची व्यवस्था करावी, असे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.सात दिवसांत वाटप करूनही व्होटर्स स्लीप वाटपाचे काम शिल्लक राहिल्यास, ११ आणि १३ आॅक्टोबरला यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल. यानंतरही हे काम पूर्ण झाले नाही तर, मतदानाच्या दिवशी म्हणजे १५ आॅक्टोबरला मतदान केंद्रावर यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येईल, असे कृष्णा यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)