शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण एक्स्प्रेसमधून दारूच्या बाटल्या जप्त

By admin | Updated: March 2, 2015 02:33 IST

होळीनिमित्त हिंगणघाटला घेऊन जात असलेल्या ६ हजार १६० रुपये किमतीच्या दारूच्या १४० बाटल्या लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दक्षिण एक्स्प्रेसमधून जप्त केल्या आहेत.

नागपूर : होळीनिमित्त हिंगणघाटला घेऊन जात असलेल्या ६ हजार १६० रुपये किमतीच्या दारूच्या १४० बाटल्या लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दक्षिण एक्स्प्रेसमधून जप्त केल्या आहेत. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.रेल्वेगाडी क्रमांक १२७२२ हजरत निजामुद्दीन-विशाखापट्टणम दक्षिण एक्स्प्रेसमधून दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ओमप्रकाश सेलुटे, विलास झोडापे, विराज मते, नरेंद्र चौधरी, विजय तायवाडे, संतोष चौबे, जितेंद्र लोखंडे यांनी प्लॅटफार्म क्रमांक २ वर सापळा रचला. दक्षिण एक्स्प्रेस येताच गाडीच्या मध्यभागी असलेल्या जनरल कोचची तपासणी केली. त्यात आरोपी सुदेश बनवारीलाल जाठ (५३) आणि उमेश बनवारीलाल जाठ (३१) रा. कंजर मोहल्ला, ता. घमापूर जि. जबलपूर हे ९० मिलिलिटरच्या १४० बाटल्या कॉलेज बॅग आणि लगेज बॅगमधून घेऊन जाताना दिसले. ते मुलताई ते हिंगणघाट असा प्रवास करीत होते. त्यांना पकडून लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्या विरुद्ध मुंबई दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असल्यामुळे होळीसाठी आणखी दारूची तस्करी होण्याची शक्यता असून पोलिसांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)