शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलला लागले वेध ‘एम्स’चे

By admin | Updated: November 3, 2014 00:38 IST

मेडिकलच्या टीबी वॉर्ड जागेवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या जागेवरील त्वचारोग विभाग आणि छाती व क्षयरोग विभागाला मेडिकलमध्ये

टीबी वॉर्डातील जागा खाली करून देण्याच्या सूचना नागपूर : मेडिकलच्या टीबी वॉर्ड जागेवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या जागेवरील त्वचारोग विभाग आणि छाती व क्षयरोग विभागाला मेडिकलमध्ये उपलब्ध रिकामी जागा पाहण्याच्या सूचना अधिष्ठात्यांनी दिल्याने विभागप्रमुखांची जागेसाठी भटकंती सुरू झाली आहे.मेडिकलच्या टीबी वॉर्डाच्या ५५ एकर जागेवर एम्स रुग्णालयाचे बांधकाम होणार आहे. सद्यस्थितीत या जागेवर मेडिकल कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, त्वचारोग विभाग आणि छाती व क्षयरोग विभाग आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाला प्राधान्य दिले जात आहे. मेडिकलच्या परिसरात इतरत्र पर्यायी जागा उपलब्ध करून देता येऊ शकते का, यावर चर्चा सुरू झाली आहे. मेडिकल परिसरात सध्या अधिष्ठात्यांच्या निवासस्थानाच्या परिसरातील जागादेखील मोकळी आहे. याशिवाय अधिकाऱ्यांची अनेक निवासस्थाने पडिक आहेत. कर्मचारी निवासस्थानासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या पाठीमागील १८ एकर जागा मोकळी आहे. या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी तीन मजली निवासस्थान उभे केले जाण्याचे प्रस्तावित आहे. या संदर्भातील प्रस्ताव तयार करणे सुरू झाले असून, लवकरच ते मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या नवीन निवासस्थानासाठी अंदाजे २०० कोटी रु पयांचा खर्च अपेक्षित आहे. त्वचारोग विभागाचे वरिष्ठ डॉक्टर शनिवारी मेडिकलमध्ये कुठे रिकामी जागा मिळते का, या शोधात होते. नेत्ररोग विभागाच्या मागील भागात असलेल्या ओटीपीटी इमारतीच्या रिकाम्या दोन मजल्यांवर त्यांची शोधमोहीम तूर्तास ती थांबलेली आहे. येथे हा विभाग हलविता येणे शक्य आहे का, यावर विचारमंथन सुरू आहे. छाती व क्षयरोग विभाग हा तूर्तास सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या चौथ्या माळ्यावर रिकाम्या असलेल्या दोन वॉर्डात नेण्याच्या तयारीत आहे. परंतु यात कितपत यश मिळते, यावर शंका व्यक्त केली जात आहे. एकूणच ‘एम्स’ला घेऊन मेडिकल प्रशासन गंभीर आहे. एम्सच्या जागेवरील अडथळे ते स्वत:हून दूर करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)