नरखेड येथे कृषिपंप ग्राहक मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST2021-03-07T04:08:55+5:302021-03-07T04:08:55+5:30

नरखेड : स्थानिक पंचायत समिती सभागृहात महाकृषी ऊर्जा अभियान-२०२० अंतर्गत कृषिपंप ग्राहकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात ३५ कृषिपंप ...

Agricultural Pump Consumer Meet at Narkhed | नरखेड येथे कृषिपंप ग्राहक मेळावा

नरखेड येथे कृषिपंप ग्राहक मेळावा

नरखेड : स्थानिक पंचायत समिती सभागृहात महाकृषी ऊर्जा अभियान-२०२० अंतर्गत कृषिपंप ग्राहकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात ३५ कृषिपंप ग्राहकांनी ९.४३ लाख रुपयांच्या बिलाचा भरणा करीत याेजनेचा लाभ घेतला.

महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दाेडके, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, काटाेलचे कार्यकारी अभियंता राजेंद्र मळसने यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला पं. स. सभापती नीलिमा रेवतकर, उपसभापती वैभव दळवी, माजी सभापती वसंत चांडक, सतीश रेवतकर आदी उपस्थित हाेते. यावेळी याेजनेत सहभागी कृषिपंप ग्राहक प्रकाश घारपुरे, अभिजित गुप्ता, अशाेक चांडक, विलास चालखाेर, विवेक बालपांडे यांना सन्मानपत्र देऊन गाैरविण्यात आले. नरखेड उपविभागांतर्गत असलेल्या तिनखेडा ग्रामपंचायतचे सरपंच सुरेश बारई यांनी महावितरणला साैर ऊर्जा प्रकल्पाकरिता ३५ एकर जमीन उपलब्ध करून देण्याबाबतच ठराव प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूरज सराेजिया यांनी केले. संचालन राजेंद्र मळसने यांनी केले, तर वैभव गणवीर यांनी आभार मानले. मेळाव्याच्या आयाेजनासाठी नीलेश मेश्राम, पंकज धाेटे, परमानंद रामटेके, अनिकेत खाेड, सलीम शेख, चित्रा बारई, स्वप्नील काळे, अश्विन कटरे, राहुल मसाने आदींनी सहकार्य केले.

Web Title: Agricultural Pump Consumer Meet at Narkhed