शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलनकर्ते धडकले

By admin | Updated: November 1, 2014 02:47 IST

पाथर्डी तालुक्यातील जवखडे येथील दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाला १३ दिवस लोटले.

नागपूर : पाथर्डी तालुक्यातील जवखडे येथील दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाला १३ दिवस लोटले. परंतु अजूनही या हत्याकांडातील खऱ्या आरोपींना अटक करण्यात न आल्याने आंबेडकरी संघटनांमध्ये असंतोष पसरला आहे. या असंतोषाचा भडका शुक्रवारी उडाला. राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत जेव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत होते, त्यावेळी नागपुरात त्यांच्या निवासस्थानी काही सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी धडक देत या हत्याकांडाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली. कवलेवाडा हत्याकांडाची घटना ताजी असताना गेल्या २० आॅक्टोबर रोजी जि. अहमदनगर ता. पाथर्डी येथील जवखेडे या गावातील १९ वर्षाचा हुशार मुलगा सुनील जाधव, त्याचे वडील संजय जाधव व आई जयश्री जाधव यांची झोपेत अमानुषपणे हत्या करण्यात आली. जातीय मानसिकतेतून करण्यात आलेल्या या हत्याकांडामुळे आंबेडकरी समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अजूनही हत्याकांडातील मुख्य आरोपींना अटक न झाल्याने असंतोष वाढला आहे. त्यामुळे या घटनेच्या गांभीर्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने आक्रमण युवक संघटना, निळाई, भारिप बहुजन महासंघ, रिपाइं सेक्युलर, आॅल इंडिया बॅकवर्ड क्लासेस लॉयर्स अ‍ॅण्ड लॉ ग्रॅज्युएट असोसिएशन, समृद्ध महिला मंडळ आदी संघटनांनी संयुक्तपणे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला. दुपारी ३.३० वाजता धरमपेठ बुद्धविहार येथून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळा सुरू होता. त्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. त्यांच्या हातात बॅनर होते. दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ घोषणा देत आंदोलनकर्ते चालत होते. जवखेडे हत्याकांड प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी. आरोपींना तातडीने अटक करावी. कवलेवाडा प्रकरणातील दोषी पोलिसांना बरखास्त करण्यात यावे, आदी मागण्या आंदोलक करीत होते. त्रिकोणी पार्कजवळ पोलिसांनी त्यांना रोखले व अटक केली. अटक झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये डॉ. संदीप नंदेश्वर, प्रमोद पाटील, विशाल वानखेडे, विजय वासे, अलका माटे, चंद्रशेखर कांबळे, राहुल वैद्य, संगीता रामटेके, वैशाली मानवटकर आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)