शहरं
Join us  
Trending Stories
1
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
2
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
3
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
4
फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
5
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
6
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
7
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
8
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
9
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
10
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
11
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
12
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
13
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
14
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
15
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
16
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
17
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
18
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
19
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
20
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
Daily Top 2Weekly Top 5

'खर्रा कॅपिटल' नंतर नागपूरचा नवा रेकॉर्ड; देशात सर्वाधिक अश्लील शेरेबाजी करणाऱ्यांचे शहर ! एनसीआरबीचे धक्कादायक आकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 14:57 IST

Nagpur : देशभरात कलम २९४ अंतर्गत एकूण १,०६३ प्रकरणे नोंदली गेली, त्यापैकी जवळपास अर्धी नागपूरमध्येच आहेत. तुलनेने, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंदूरमध्ये अशा फक्त १३४ नागपूरची या तुलनेत चार पट जास्त आहेत.

नागपूर :नागपूर केवळ संत्र्यांसाठी प्रसिद्ध असलेलं शहर नाही हे आपल्याला शहराचे खर्रा कॅपिटल म्हणून नवीन नामोल्लेख झाल्यापासून समजलंच असेल पण त्यात भर घालायला नागपूर आता वेगळ्याच कारणासाठी 'कुप्रसिद्ध' होत आहे आणि ते म्हणजे अश्लील कृत्ये, अश्लील शेरेबाजी, शिवीगाळ व अश्लील गाणी म्हणणे यासंबंधी नागपूर देशात अव्वल ठरले. भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ अंतर्गत म्हणजेच “सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द किंवा कृती” या गुन्ह्यांत नागपूरने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकड्यांनुसार  २०२३ मध्ये एकूण ५६१ गुन्हे या कलमान्वये नागपूरमध्ये नोंदवले गेले, जे देशातील कोणत्याही शहरापेक्षा सर्वाधिक आहेत. 

देशभरात कलम २९४ अंतर्गत एकूण १,०६३ प्रकरणे नोंदली गेली, त्यापैकी जवळपास अर्धी नागपूरमध्येच आहेत. तुलनेने, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंदूरमध्ये अशा फक्त १३४ नागपूरची या तुलनेत चार पट जास्त आहेत, आणि मुंबईत ४८ प्रकरणे नोंदली गेली. ही तफावत इतका मोठा आहे की नागपूरच्या या “रेकॉर्ड”कडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलिस आणि कायदा काय म्हणतो?

पोलिसांच्या मते, प्रत्येक चिडवणं किंवा टोमणा हा गुन्हा ठरत नाही. तो सार्वजनिक ठिकाणी आणि एखाद्याच्या मनःस्तापाला कारणीभूत झाला तर तो गुन्हा ठरतो. भादंवि कलम २९४ (आता कलम २९६) नुसार, अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास, दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तथापि, न्यायालयात “या वक्तव्यामुळे खरंच कोणाला त्रास झाला का” हे सिद्ध करणे कठीण ठरते, असे पोलिसांनी मान्य केले आहे

समाजासाठी इशारा की आरसा?

या आकड्यांकडे फक्त गुन्हेगारीच्या दृष्टीने न पाहता, सामाजिक वर्तणुकीचा आरसा म्हणून पाहण्याची गरज आहे. शब्दांची ताकद अमर्याद असते, पण ती जबाबदारीने वापरणे तितकेच महत्त्वाचे आहे. शहरातील नागरिकांनी सभ्यता आणि सार्वजनिक शिष्टाचार जपले, तर नागपूर पुन्हा “संत्रानगरी” या नावानेच ओळखले जाईल, “अश्लील टिप्पणींचे केंद्र” म्हणून नाही.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur tops India in obscene remarks; NCRB data shocking.

Web Summary : Nagpur is now infamous for obscene acts, topping India in lewd comments. NCRB data reveals 561 cases under IPC 294 in 2023, far exceeding other cities like Indore and Mumbai. Police emphasize proving public distress for conviction, urging responsible speech for a better image.
टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबई